IND Vs SL: IND Vs SL: ऋतुराज गायकवाड ते देवदत्त पडिकल 'या' 5 खेळाडूंची टीम इंडियामध्ये प्रथमच निवड; जाणून घ्या त्यांचे आयपीएल रेकॉर्ड
शिखर धवनच्या नेतृत्वात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध 13 जुलैपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू करणार आहे. हा संघ टी 20 मालिकादेखील खेळणार आहे. बर्याच नवीन चेहऱ्यांना श्रीलंका दौर्यावर पदार्पण करण्याची संधी मिळणार आहे.

IND Vs SL: श्रीलंका दौर्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. यावेळी संघात पाच नवीन खेळाडूंना संधी मिळाली आहे. यामध्ये देवदत्त पाडीकल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, कृष्णाप्पा गौतम आणि चेतन साकारिया यांचा समावेश आहे. या खेळाडूंना श्रीलंका दौर्यावर पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. घरगुती क्रिकेटपासून ते आयपीएलपर्यंत या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करून निवडकर्त्यांना प्रभावित केले. आज आम्ही तुम्हाला या खेळाडूंच्या आयपीएल रेकॉर्डविषयी माहिती देणार आहोत.
देवदत्त पडिकल
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (RCB) फलंदाज देवदत्त पडिकल गेल्या वर्षी आयपीएलमधील आपल्या शानदार कामगिरीमुळे प्रकाशझोतात आला. बंगळुरूकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये देवदत्तचाही समावेश आहे. त्याने आयपीएल 2021 मध्ये 15 सामने खेळले असून त्यामध्ये त्याने 124 च्या स्ट्राइक रेटने 473 धावा केल्या. यात 5 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याशिवाय आयपीएल 2021 पुढे ढकलण्यापर्यंत त्याने 6 सामन्यांत 152 च्या स्ट्राईक रेटने 195 धावा केल्या. यात नाबाद शतकाचाही समावेश आहे.
ऋतुराज गायकवाड
चेन्नई सुपर किंग्जच्या वतीने ऋतुराज गायकवाडनेही आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. जर आपण त्याच्या आयपीएलचे रेकॉर्ड पाहिले तर आयपीएल 2020 मध्ये त्याला 6 सामने खेळण्याची संधी मिळाली. यात त्याने 120.71 च्या स्ट्राइक रेटने 169 धावा केल्या. तर आयपीएल 2021 मध्ये त्याने 128.94 च्या स्ट्राईक रेटने 7 सामन्यांत 196 धावा केल्या. यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
नितीश राणा
मुंबई इंडियन्सचा सलामीवीर नितीश राणा अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये चांगली फलंदाजी करत आहे. तो 2016 पासून आयपीएलचा एक भाग आहे. त्याने आयपीएल 2016 मध्ये 4 सामन्यांत 104 धावा, 2017 मध्ये 13 सामन्यात 333 धावा, आयपीएल 2018 मध्ये 15 सामन्यांत 344 धावा केल्या. याशिवाय आयपीएल 2019 मध्ये नितीश राणाने 14 सामन्यांत 344 धावा, 2020 मध्ये 14 सामन्यांत 352 धावा आणि 2021 मध्ये सात सामन्यात 201 धावा केल्या आहेत. आत्तापर्यंत त्याने आयपीएल कारकीर्दीत 13 अर्धशतके ठोकली आहेत.
कृष्णप्पा गौतम
कृष्णाप्पा गौतम आयपीएलमधील पंजाब किंग्जचा एक भाग आहे. तो फलंदाजी तसेच गोलंदाजी देखील करू शकतो. वर्ष 2018 मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. पहिल्या सत्रात त्याने 15 सामने खेळले. यात 11 विकेट्स घेतल्या आणि 126 धावांचे योगदान दिले. वर्ष 2019 त्याच्यासाठी चांगले नव्हते आणि 7 सामन्यात तो फक्त एक विकेट घेऊन 9 धावा करु शकला. सन 2020 मध्ये, त्याने दोन सामने खेळले, त्यामध्ये त्याने एक विकेट घेतली आणि 42 धावा केल्या.
चेतन सकारिया
सौराष्ट्रचा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाने नुकतेच आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून 7 सामने खेळले आणि 8.22 च्या इकॉनमीसह 7 बळी घेतले. घरगुती सामन्यांमध्ये साकारियाची कामगिरी चांगली राहिली असून, त्या दृष्टीने बीसीसीआयने त्याला श्रीलंका दौर्यासाठी संघात निवडले आहे. तो श्रीलंकेत कशी कामगिरी करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
