IND vs PAK : भारतीय हॉकी संघाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, हरमनप्रीत सिंगची चमकदार कामगिरी; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Asian champions trophy hockey : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2023 (asian champions trophy hockey) मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे.
IND vs PAK : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2023 (asian champions trophy hockey) मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने पाकिस्तानचा 4-0 ने पराभव केला. हरमनप्रीत सिंगच्या (Harmanpreet Singh) नेतृत्वाखालील भारतीय संघाने हा समाना एकतर्फी जिंकला. या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंगने 2 गोल केले. याशिवाय जुगराज सिंग आणि आकाशदीप सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पहिल्या मिनिटांपासूनच चुरशीचा होणार असं वाटत होतं. पण बलाढ्या भारतीय संघाने पहिल्या मिनीटीपासूनच पाकिस्तानवर दबाव टाकत विज मिळवला.
पराभवानंतर पाकिस्तानचा संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर
पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र आता आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पाकिस्तानचा प्रवास संपला असून, त्यांचा संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर गेला आहे. दरम्यान, भारतानं हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पुन्हा पटकावले आहे. भारताचे आता 13 गुण झाले असून चांगल्या गोलफरकांच्या आधारे भारताने अव्वल स्थान पटकावले. सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पाकिस्तानला हा सामना जिंकणे किंवा ड्रॉ करणे आवश्यक होते. परंतू टीम इंडियाने एकतर्फी सामन्यात त्यांचा 4-0 असा पराभव केला.
भारतीय संघाच्या हरमनप्रीत सिंगचे 2 गोल केले
भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने 2 गोल केले. तसेच जुगराज सिंग आणि आकाशदीप सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. या सर्वांच्या कामगिरीच्या बळावर भारतीय हॉकी संघानं पाकिस्तानचा पराभव केला. दरम्यान, आता भारतीय संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. या सामन्यापूर्वी भारतीय हॉकी संघानं दक्षिण कोरियाचा पराभव केला होता. दक्षिण कोरियापूर्वी भारतीय संघाने मलेशियाचा 5-0 असा पराभव केला होता. आता टीम इंडिया आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी 2023 च्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. सामन्यातील चारही सत्रांत एकेक गोल करून भारताने नवख्या खेळाडूंचा समावेश असलेल्या पाकिस्तान संघावर पूर्ण वर्चस्व राखले. या स्पर्धेत भारत अव्वल स्थानी आहे.
चार विजय आणि एक अनिर्णित लढतीसह भारताने 13 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. तर मलेशियाने गतविजेत्या कोरियावर एका गोलने मात करत दुसरा क्रमांक मिळवला. कोरियाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. जपानने चीनवर २-१ असा विजय मिळविल्याने पाकिस्तानला भारताविरुद्ध विजय अनिवार्य होता. मात्र, भारताच्या ताकदवान खेळापुढे पाकिस्तानच्या खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधीच मिळाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या: