एक्स्प्लोर

IND vs NZ 2nd Test: भारतीय संघात होऊ शकतात 'हे' तीन बदल; 'हा' खेळाडू करणार पदार्पण

India vs New Zealand 2nd Test: आजपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियात तीन बदल होण्याची शक्यता आहे.

India vs New Zealand 2nd Test: भारत आणि न्यूझीलँड दरम्यान आजपासून दुसरा आणि अखेरचा कसोटी वानखेडे स्टेडिअमवर सुरू होत आहे. मुंबईतील बदललेले वातावरण पाहता टीम इंडिया आपल्या संघात तीन बदल करण्याची शक्यता आहे. 

विराट कोहलीचे कमबॅक

कानपूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे याने संघाचे नेतृत्व केले होते. भारतीय संघात विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे संघाची धुरा विराट कोहलीकडे जाणार आहे. तर, अजिंक्य रहाणे संघाचा उपकर्णधार असणार आहे. कोहलीशिवाय भारतीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यालाही संधी मिळू शकते. 

नवीन खेळाडूचे पदार्पण

भारताचा यष्टिरक्षक वृद्धिमान साहा याने कानपूर कसोटीत दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते. मात्र, जखमी असल्याने त्याने यष्टिरक्षण केले नव्हते. त्याच्या ऐवजी के.एस. भरत याने दोन्ही डावात यष्टिरक्षण केले होते. त्याची कामगिरीही चांगली होती. त्यामुळे भारतीय संघाकडून आज के.एस. भरत पदार्पण करू शकतो. 

या खेळाडूंना वगळले जाणार?

मुंबई कसोटी सामन्यात टीम इंडिया आपल्या अंतिम संघात तीन बदल करण्याची शक्यता आहे. सलामीवीर मयंक अग्रवाल, यष्टिरक्षक वृद्धिमान साहा आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा यांना संघातून वगळण्यात येण्याची शक्यता आहे. त्यांच्याऐवजी विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि के.एस. भरत यांचा समावेश होऊ शकतो. 

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संभाव्य टीम इंडिया: 

विराट कोहली (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, के. एस. भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Mumbai Women Cricket Scorer : मुंबई कसोटीत स्कोरिंगची सूत्रं 'ती'च्या हाती

IND vs NZ : भारत - न्यूझीलंड कसोटीवर पावसाचं सावट

 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
Yashveer Goud : हमजा जहूरसमोर आक्रमक बाणा का दाखवला? टीम इंडियाच्या यशवीर गौडनं आक्रमक जल्लोषाचं कारण सांगत म्हणाला...
हमजा जहूरसमोर आक्रमक बाणा का दाखवला? यशवीर गौडनं आक्रमक जल्लोषाचं कारण सांगत म्हणाला...
Siraj : तिरंग्याचा मान राखण्यासाठी मोहम्मद सिराज धावला, सुरक्षा रक्षकाच्या हातातून तिरंगा खेचला, नेटकऱ्यांकडून सिराजचं कौतुक Video 
तिरंग्याचा अपमान होतोय ते पाहताच सिराजची धाव, सुरक्षारक्षकाच्या हातून राष्ट्रध्वज काढून घेतला, व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Decline In Groundwater Levels: राज्यात भूजल पातळीत झपाट्याने घट; सर्वेक्षणात चिंता वाढवणारी माहिती समोर
राज्यात भूजल पातळीत झपाट्याने घट; सर्वेक्षणात चिंता वाढवणारी माहिती समोर
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Embed widget