IND vs AUS Sydney Test: रविंद्र जडेजा म्हणतो, स्टीव्ह स्मिथला 'रन आउट' करणे ही माझी सर्वोत्तम फील्डिंग, पाहा व्हिडिओ
सिडनी येथे सुरू असलेल्या तिसर्या कसोटीच्या दुसर्या दिवशी रविंद्र जडेजाने आपल्या शानदार थ्रोने स्टीव्ह स्मिथला बाद करुन तंबूचा मार्ग दाखविला. दिवसाचा खेळ संपल्यावर जडेजाने या धावचीतला आपले सर्वोत्तम क्षेत्ररक्षण म्हटले आहे.
![IND vs AUS Sydney Test: रविंद्र जडेजा म्हणतो, स्टीव्ह स्मिथला 'रन आउट' करणे ही माझी सर्वोत्तम फील्डिंग, पाहा व्हिडिओ IND vs AUS Sydney Test: Ravindra Jadeja named Steve Smiths run out as his best fielding video IND vs AUS Sydney Test: रविंद्र जडेजा म्हणतो, स्टीव्ह स्मिथला 'रन आउट' करणे ही माझी सर्वोत्तम फील्डिंग, पाहा व्हिडिओ](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/08220622/jadeja.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs Australia: सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या जाणार्या तिसऱ्या कसोटीच्या दुसर्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक रवींद्र जडेजाने स्टीव्ह स्मिथला शानदार थ्रो करत बाद करून तंबूचा मार्ग दाखविला. जडेजाचा हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहण्याची इच्छा होईल. दिवसाचा खेळ संपल्यावर जडेजाने या विकेटला आपले सर्वोत्तम क्षेत्ररक्षण म्हटले आहे.
जेव्हा ऑस्ट्रेलियाने आपले 9 गडी गमावले होते त्यावेळी स्मिथ 130 धावांवर फलंदाजी करत होता. अशा स्थितीत स्मिथचा हेतू होता की स्ट्राइक त्याच्या हातात असावी. म्हणूनच बुमराहला स्मिथने लेग साइडमध्ये दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा डाव जडेजाच्या स्टम्पवर थेट थ्रोने संपला. जडेजाने डीप स्क्वेअर लेगपासून धावताना चेंडूला उचलला आणि सरळ स्टंपवर फेकला. जडेजाच्या या फील्डिंगचे सर्वांनाच कौतुक केले आहे.
Just King Jadeja things ????#INDvsAUS pic.twitter.com/uFbZ4Xewsi
— Ayush (@TangledWithYou_) January 8, 2021
दुसर्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जेव्हा जडेजाला विचारले गेले की, तुम्ही चार विकेट घेतल्या. तुम्हाला त्या पाहायला आवडेल की स्टीव्ह स्मिथला धावचीत केलेलं पाहायला आवडेल? प्रत्युत्तरादाखल भारतीय अष्टपैलू म्हणाला की, “मी या रन आऊटला रिवाईंड (मागे जाणे) करुन पुन्हा प्ले करेल. कारण हा माझा सर्वोत्तम प्रयत्न आहे. 30 यार्डच्या वर्तुळाबाहेरुन थेट हिट करणे, हा असा क्षण आहे, जो आपल्याला समाधान देईल. "जडेजा पुढे म्हणाला की तीन किंवा चार विकेट घेणे ठीक आहे. पण हा रन आऊट माझ्या नेहमीच आठणवीत राहिल.
IND vs AUS, 3rd Test, Day 2 Stumps Score | दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारत 2 बाद 96 धावा
या दौर्यावर जडेजा खूप चपळाईने फिल्डिंग करताना आहे, ज्यामध्ये त्याने काही उत्तम झेल घेतले आहेत, त्यातील एक मॅथ्यू वेडनटा एमसीजीवर धावताना पकडला होता, आणि शुक्रवारी महत्त्वपूर्ण वेळी स्मिथला धावबाद करणे देखील महत्त्वाचे होते. त्यावेळी जडेजाने स्मिथला बाद केले नसते तर ऑस्ट्रेलिया आणखी 20-25 धावा करू शकला असता.
IND vs AUS 3rd Test | दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडिया 2 बाद 96, ऑस्ट्रेलियाकडे 242 धावांची आघाडी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)