एक्स्प्लोर

IND vs AUS 3rd Test 2nd Day : भारताचा डाव 443 धावांवर घोषित, ऑस्ट्रेलिया बिनबाद 8 धावा

चेतेश्वर पुजारानं कारकिर्दीतलं सतरावं कसोटी शतक साजरं केलं. तर कोहलीनं नाबाद अर्धशतकी खेळी उभारत मैदानात तळ ठोकला आहे. या दोघांनी आतापर्यंत अभेद्य दीडशतकी भागीदारी साकारत टीम इंडियाला मजबूत स्थितीत नेऊन ठेवलं आहे.

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या मेलबर्न कसोटीत चेतेश्वर पुजाराच्या दमदार शतकाच्या जोरावर टीम इंडियानं पहिला डाव सात बाद 443 धावांवर घोषित केला. पुजारानं कसोटी कारकीर्दीतलं आपलं सतरावं शतक साजरं केलं. त्यानं 10 चौकारांसह 106 धावांची खेळी उभारली. तर कर्णधार कोहलीनं नऊ चौकारांसह 82 धावांचं योगदान दिलं.

पुजारा आणि विराटनं तिसऱ्या विकेटसाठी 170 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर आलेल्या रोहित शर्मानंही 63 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सनं तीन आणि मिचेल स्टार्कनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. तर नॅथन लायन आणि हेजलवूडनं प्रत्येकी एक विकेट घेतली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात बिनबाद आठ धावांची मजल मारली आहे.

पहिला दिवस

पहिल्या दिवसअखेर टीम इंडियाने मयंक अगरवाल आणि चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकांच्या जोरावर दोन बाद 215 धावांची मजल मारली होती. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार कोहली 47 तर पुजारा 68 धावांवर खेळत होता.

विराट आणि पुजारानं तिसऱ्या विकेटसाठी रचलेली 92 धावांची अभेद्य भागीदारी आणि पदार्पणवीर मयांक अगरवालची अर्धशतकी खेळी हे पहिल्या दिवसाचं वैशिष्ट्य होतं. मयांकनं आठ चौकार आणि एका षटकारासह 76 धावांची खेळी उभारली.

भारताचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून कर्नाटकच्या मयांक अगरवालनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे मेलबर्नची ही तिसरी कसोटी दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे. भारतानं अॅडलेडच्या पहिल्या कसोटीत 31 धावांनी विजय साजरा केला होता. तर ऑस्ट्रेलियानं पर्थची कसोटी 146 धावांनी जिंकत मालिकेत बरोबरी साधली.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात तीन बदल करण्यात आले आहेत. सलामीवीर मुरली विजय आणि लोकेश राहुलला वगळून मयांक अगरवालला खेळवण्याचा निर्णय संघव्यवस्थापनानं घेतला आहे. याशिवाय रोहित शर्माचं आणि रविंद्र जाडेजाचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादवला विश्रांती देऊन जाडेजाचा संघात समावेश करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 2nd T20 : अय्यर-गंभीरचे सर्व डावपेच फ्लॉप! रेकॉर्डब्रेक धावा करूनही भारत हरला, शाई होपने काढला सगळा हिशोब; वेस्ट इंडिजकडून धावांचा ऐतिहासिक पाठलाग
अय्यर-गंभीरचे सर्व डावपेच फ्लॉप! रेकॉर्डब्रेक धावा करूनही भारत हरला, शाई होपने काढला सगळा हिशोब; वेस्ट इंडिजकडून धावांचा ऐतिहासिक पाठलाग
IND vs WI 2nd T20 Score : शाई होपचं शतक! वेस्ट इंडिजकडून टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव
शाई होपचं शतक! वेस्ट इंडिजकडून टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव
Sanju Samson IND vs WI 2nd T20 : दोन जीवदान मिळाले, संजूने संधीचं सोनं केलं! रांचीमध्ये चौकार-षटकारांचा थरार, शतकाने मात्र दिली हुलकावणी, नेमकं काय घडलं?
दोन जीवदान मिळाले, संजूने संधीचं सोनं केलं! रांचीमध्ये चौकार-षटकारांचा थरार, शतकाने मात्र दिली हुलकावणी, नेमकं काय घडलं?
SA vs AUS 1st Test : जिथे सँडपेपर प्रकरणात बदनामी झाली, तिथेच ऐतिहासिक झेप! दक्षिण आफ्रिकेत स्टीव्ह स्मिथने रचला नवा इतिहास, नेमकं काय घडलं?
जिथे सँडपेपर प्रकरणात बदनामी झाली, तिथेच ऐतिहासिक झेप! दक्षिण आफ्रिकेत स्टीव्ह स्मिथने रचला नवा इतिहास, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget