Virat Kohli : विराट करणार नवीन विक्रम, सचिन, पॉन्टिंगला टाकणार मागे
एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहली (Virat Kohli) हाच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड्स तोडू शकतो असं म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतील आजच्या सामन्यात विराटकडे सर्वाधिक वेगाने 12 हजार धावा करण्याची संधी आहे.
IND vs AUS 3rd ODI : एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहली हाच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड्स तोडू शकतो असं म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतील आजच्या सामन्यात विराटकडे सर्वाधिक वेगाने 12 हजार धावा करण्याची संधी आहे. विराटनं आतापर्यंत 250 एकदिवसीय सामन्यात 11977 धावा केल्या आहेत. आज त्याने 23 धावा केल्या तर तो सचिनचा विक्रम मोडेल. सचिन तेंडुलकरने 309 व्या सामन्यात 12 हजार धावांचा पल्ला गाठला होता.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत केवळ सचिन तेंडुलकर (18, 426), कुमार संगकारा (14,234), रिकी पॉन्टिंग (13,704), सनथ जयसूर्या (13,430) आणि माहेला जयवर्धने (12,650) हे चारच खेळाडू विराटच्या पुढं आहेत, जे सध्या क्रिकेट खेळत नाहीत.
पॉन्टिंगचाही विक्रम मोडणार
एकूण शतकांच्या बाबतील विराट कोहली हा ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडू शकतो. पॉन्टिंगनं 560 सामन्यामध्ये 71 शतकं लगावली आहे. कोहली या विक्रमापासून एक शतक दूर आहे. जर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कोहलीनं दोन शतकं केली तर तो पॉन्टिंगला मागे टाकू शकतो. कोहली या दौऱ्यात आणखी एक वनडे, तीन टी-20 आणि एक कसोटी सामना खेळणार आहे. या दोघांपेक्षा अधिक शतकं ही सचिनच्या नावे आहेत. सचिननं 664 सामन्यांमध्ये 100 शतकं लगावली आहेत.
IND vs AUS 3rd ODI | 'या' बदलांसह दोन्ही संघ मैदानात उतरण्याची शक्यता, संभाव्य प्लेईंग इलेव्हन
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 हजार धावा पूर्ण
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने आतापर्यंत 418 सामन्यांमध्ये 70 शतकांसह 22,011 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर (34,357), कुमार संगकारा (28,016), रिकी पॉन्टिंग (27,483), माहेला जयवर्धने (25,957), जॅक कॅलिस (25,534), राहुल द्रविड (24,208) आणि ब्रायन लारा (22,358) कोहलीपेक्षा पुढं आहेत.
250 वनडे खेळणार आठवा खेळाडू
32 वर्षीय विराट कोहलीनं आपला पहिला एकदिवसीय सामना ऑगस्ट 2008 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. या मालिकेतील दुसरा सामना खेळत असताना त्यानं 250 सामने खेळण्याचा विक्रम केला. 250 एकदिवसीय सामने खेळणारा विराट आठवा भारतीय खेळाडू ठरला. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, राहुल द्रविड, मोहम्मद अझहरुद्दीन, सौरव गांगुली, युवराज सिंह आणि अनिल कुंबळेनं 250 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत.