एक्स्प्लोर

ICC World Cup 2019 : सामनाच नाही मनंही जिंकली, स्मिथकडून विराटचे आभार

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकवण्यात हातभार लावलाच पण सोबत आपल्या कृत्याने सगळ्यांचं मनंही जिंकलं.

लंडन : लंडनच्या ओव्हल मैदानात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात कर्णधार विराट कोहलीचं एका खास कारणाने कौतुक होत आहे. हे कौतुक त्याच्या 82 धावांच्या खेळीमुळे किंवा नेतृत्त्व कौशल्यामुळे नाही तर त्याच्या खिलाडूवृत्तीमुळे होत आहे. नेमकं काय घडलं? भारतीय डावादरम्यान काही भारतीय प्रेक्षक सीमेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथला चिडवत होते. त्यावेळी विराट कोहली मैदानात होता. त्याने हा प्रसंग पाहिला आणि तिथून प्रेक्षकांना इशारा करुन टाळ्या वाजवून स्मिथला चीअर करण्यास सांगितलं. यानंतर प्रेक्षक शांत झाले. परंतु दुसऱ्या डाव्यात फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या स्मिथला पाहून भारतीय प्रेक्षकांनी पुन्हा 'चीटर, चीटर' म्हणण्यास सुरुवात केली होती. खुद्द आयसीसीनेही हा व्हिडीओ ट्वीट करुन विराट कोहलीची प्रशंसा केली आहे. स्मिथकडून आभार विराट कोहलीच्या या कृत्यामुळे स्टीव्ह स्मिथला भरुन आलं. पीचजवळ येत त्याने कोहलीची पाठ थोपटून त्याच्या खिलाडूवृत्तीसाठी आभार मानले. यानंतर पत्रकार परिषदेत कोहलीने प्रेक्षकांच्या वतीने स्मिथची माफीही मागितली. कोहलीच्या या शालीनतेचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. इंग्लंडमध्ये स्टीव्ह स्मिथसोबत असा प्रसंगा घडण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी वेस्ट इंडिज विरुद्धच्या सराव सामन्यात अर्धशतक केल्यानंतर बॅट उंचावल्यानंतरही प्रेक्षकांनी त्याला चिडवलं होतं. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचं बॉल टॅम्परिंग ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर कॅमरुन बॅनक्रॉफ्टने मागील वर्षी केपटाऊन कसोटीत सॅण्डपेपरचा वापर करुन चेंडूसोबत छेडछाड केली होती, तसाच प्रकार झॅम्पाने केल्याचं नेटकऱ्यांचं मत आहे. मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंगप्रकरणी बॅनक्रॉफ्ट, डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव स्मिथ दोषी सिद्ध झाले होते. यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यावर प्रत्येकी एक वर्षाची तर बेनक्राफ्टवर नऊ महिन्यांदी बंदी घालण्यात आली होती. स्मिथ आणि वॉर्नरने 2019 आयपीएलमध्ये पुनरागमन केलं. यानंतर विश्वचषक 2019 मध्ये हे दोघे ऑस्ट्रेलियान संघात परतले. भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी मात करुन, इंग्लंडमधल्या विश्वचषकात सलग दुसरा विजय साजरा केला. ओव्हलवरच्या या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 353 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत सर्व बाद 316 धावांचीच मजल मारता आली. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराने प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं. लेग स्पिनर यजुवेंद्र चहलने दोन विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि अॅलेक्स कॅरीने अर्धशतकं झळकावली. पण तरीही ऑस्ट्रेलिया संघ विजयापासून 36 धावांनी दूर राहिला.

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget