Abdullah Shafique : पाकिस्तानच्या गोलंदाजांना चोपले, पण सलामीवीर शफीकनं लाज राखली; झळकावलं पहिलंवहिलं शतक
पाकिस्तानची (Pakistan vs Sri Lanka) अवस्था 2 बाद 37 अशी झाली असताना शफीक आणि मोहम्मद रिझवानने संघाचा डाव सांभाळत सुस्थितीत नेलं आहे. पाकिस्तानने 32 षटकांत 2 बाद 207 अशी मजल मारली आहे.
हैदराबाद : श्रीलंकेनं ठेवलेल्या 345 धावांचा पाठलाग करताना (ICC Cricket World Cup 2023) पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल्लाह शफीकने दमदार कामगिरी करताना पहिलं वनडे शतक झळकावले. पाकिस्तानची (Pakistan vs Sri Lanka) अवस्था 2 बाद 37 अशी झाली असताना शफीक आणि मोहम्मद रिझवानने संघाचा डाव सांभाळत सुस्थितीत नेलं आहे. पाकिस्तानने 32 षटकांत 2 बाद 207 अशी मजल मारली आहे. रिझवान 67 धावांवर खेळत आहे.
तत्पूर्वी, वर्ल्डकपच्या (ICC Cricket World Cup 2023) सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं धावांचा डोंगर रचल्यानंतर जोरदार प्रतिकार केलेल्या श्रीलंकेनं (Pakistan vs Sri Lanka) आपला फलंदाजीतील तोच धबधबा दुसऱ्या सामन्यातही कायम ठेवला. कुसल मेंडिस पाकिस्तानचा वेगवान मारा चोपून काढत विक्रमी शतकाची नोंद केली. मेंडिसने अवघ्या 65 चेंडूत शतक ठोकत श्रीलंकेकडून वर्ल्डकपच्या इतिहासात (ICC Cricket World Cup 2023) सर्वात वेगवान शतक करण्याचा मान मिळवला. यापूर्वी श्रीलंकेकडून कुमार संगकाराने 2015 मध्ये 70 चेंडूत शतक ठोकले होते.
जगातील सर्वोत्तम वेगवान माऱ्यांपैकी एक असलेल्या पाकिस्तानच्या (ICC Cricket World Cup 2023) वेगवान गोलदाजीचा सामना करत श्रीलंकेनं 344 धावांचा डोंगर उभा केला. कुसल मेंडिसने झळकावलेल्या विक्रमी शतकानंतर सदीरा समराविक्रमाने सुद्धा झळकावलेल्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारता आली. कुसल परेरा लवकर बाद झाल्यानंतर कुसल मेंडिसने डाव आपल्या हाती घेतला. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या पॉवरप्लेमध्ये 8 षटकारांसह आपण काय करू शकतो हे दाखवून दिले होते. आज त्याने आणखी एक चांगली कामगिरी केली. सुरुवातीला निसांकासोबत डाव सावरला.
इतर महत्वाच्या बातम्या