New Zealand vs Afghanistan : दमदार सुरुवातीनंतर न्यूझीलंड अफगाण गोलंदाजांच्या जाळ्यात अडकला; झटपट तीन धक्के
अफगाणिस्तानचा गोलंदाज अजमतुल्लाहने एका षटकामध्ये रचिन रविंद्र आणि विल यंग यांना बाद करत न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलले. त्यामुळे एक बाद 109 या स्थितीतून त्यांची 3 बाद 110 अशी झाली.
New Zealand vs Afghanistan : विश्वविजेत्या (ICC Cricket World Cup 2023) इंग्लंडविरुद्ध वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात सनसनाटी विजयाची नोंद केल्यानंतर अफगाणिस्तानची लढत आज स्पर्धेतील मातब्बर संघ असलेल्या न्यूझीलंडशी होत आहे. या सामन्यामध्ये अफगाणिस्ताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात डेवाॅन कान्वे आणि विल यंग यांनी केली. संघाची धावसंख्या अवघी 30 झाली असताना सातव्या शतकामध्ये कॉन्वेला मुजीबने बाद करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. यानंतर विल यंग आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रचिन रवींद्र यांनी संघाचा डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. मात्र ही भागीदारी तोडण्यात अफगाणिस्तानच्या फिरकीला यश आले.
109/1 to 110/4.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 18, 2023
Afghanistan have picked up 3 crucial wickets in no time, Rashid Khan the latest to pick Mitchell. pic.twitter.com/OqWon4M0Jx
अफगाणिस्तानचा गोलंदाज अजमतुल्लाहने एका षटकामध्ये रचिन रविंद्र आणि विल यंग यांना बाद करत न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकलले. त्यामुळे एक बाद 109 या स्थितीतून त्यांची 3 बाद 110 अशी झाली. त्यानंतर आलेल्या मिशेल सुद्धा रशीद खानचा बळी ठरला. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था आणखी बिकट झाली. न्यूझीलंडची अवस्था 21.4 षटकांत चार बाद 110 अशी झाली. मागील सामन्यातही इंग्लंडविरोधात अफगाणिस्तानची फिरकी गोलंदाजी निर्णायक राहिली होती. अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांसमोर इंग्लंडचा डाव गडगडला होता. त्यामुळे आज सुद्धा न्यूझीलंडची फलंदाजी अफगाणी माऱ्यासमोर थोडी अडखळताना दिसून येत आहे. या सामन्यात सुद्धा मोठी कामगिरी करून स्पर्धेमधील आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न अफगाणिस्तानचा असेल.
Azmatullah Omarzai on fire - 2 wickets in the over. First Ravindra and now Young, both the set batters depart.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 18, 2023
New Zealand 110/3 now! pic.twitter.com/Nnh6jnZR3C
मागील सामन्यात 285 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या विश्वविजेत्या इंग्लंडला 210 धावांमध्ये गुंडाळत अफगाणिस्तानने 69 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. तब्बल 15 व्या सामन्यात अफगाणिस्तानने वर्ल्डकपमध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानची फिरकी त्रिमूर्ती असलेल्या मुजीबूर रहमान (3 विकेट), रशीद खान (3 विकेट) आणि मोहम्मद नबी (2 विकेट) यांनी आठ विकेट घेत इंग्लंडला पार नेस्तनाबूत केला.
फारुकी आणि नावीन हकने प्रत्येकी एक विकेट घेतली. पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानने इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडतना 284 धावा कुटल्या. इंग्लंडने या सामन्यामध्ये तब्बल सात गोलंदाजांचा वापर केला, तरीही अफगाणिस्तानला रोखण्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना यश आलं नाही.
इतर महत्वाच्या बातम्या