KL Rahul : केएल राहुलला मिळाली सर्वात मोठी जबाबदारी; संघ व्यवस्थापन सुद्धा प्रत्येक विषयावर चर्चा करणार!
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर पांड्याला न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध खेळात आलं नाही. आयसीसीने पांड्या यापुढे खेळू शकणार नसल्याचे सांगितले.
कोलकाता : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर बीसीसीआयने विकेटकीपर बॅट्समन केएल राहुलची नवीन उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. हार्दिक पांड्या घोट्याच्या दुखापतीमुळे 2023 च्या वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी प्रसिध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे. बोर्डाने केएल राहुलकडे उपकर्णधारपद सोपवले आहे.
KL Rahul appointed as Vice Captain of team India in this World Cup.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 4, 2023
Recovering from injury to proving his worth and now becoming VC in the World Cup, a comeback to remember by KL...!!! pic.twitter.com/D1cA8IqxXe
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. त्यानंतर पांड्याला न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंकेविरुद्ध पुनरागमन करता आले नाही. शनिवारी आयसीसीने पांड्या यापुढे विश्वचषक खेळू शकणार नसल्याचे जाहीर केले. पांड्या बाहेर पडल्यानंतर वरिष्ठ निवड समितीने केएल राहुलची उपकर्णधारपदी नियुक्ती केली. 2023 च्या विश्वचषकात उपांत्य फेरीतील सामना सोडून टीम इंडियाला अजूनही दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सविरुद्ध खेळायचे आहे.
KL Rahul has been appointed as the Vice-Captain of Indian team in World Cup. [The Indian Express] pic.twitter.com/oc13SuK4SK
— Johns. (@CricCrazyJohns) November 4, 2023
राहुलला आता विशेष जबाबदारी मिळणार
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी केएल राहुलची उपकर्णधारपदी नियुक्ती केली. आतापर्यंत, केएल राहुल यष्टिरक्षक म्हणून गोलंदाजांच्या मीटिंगमध्ये भाग घेत होता, आता उपकर्णधार म्हणून, गोलंदाज आणि फलंदाजीसह सर्व संघ मीटिंगचा भाग असतील. संघ व्यवस्थापनही राहुलसोबत प्रत्येक विषयावर चर्चा करणार आहे.
Winners of best fielder awards 🏅
— Johns. (@CricCrazyJohns) November 3, 2023
1st match - Virat Kohli.
2nd match - Shardul Thakur.
3rd match - KL Rahul.
4th match - Ravi Jadeja.
5th match - Shreyas Iyer.
6th match - KL Rahul.
7th match - Shreyas Iyer. pic.twitter.com/jI4YfMsJ5S
राहुलला कर्णधारपदाचा अनुभव
केएल राहुलकडेही संघाचे नेतृत्व करण्याचा बराच अनुभव आहे. राहुलने आतापर्यंत 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे, ज्यापैकी संघाने 6 जिंकले आहेत आणि 3 सामने गमावले आहेत. याशिवाय केएल राहुलही या वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 97 धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. तो सामना संघाला जिंकून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर बांगलादेशविरुद्धही त्याने कोहलीच्या साथीने संघाला विजय मिळवून दिला.
इतर महत्वाच्या बातम्या