एक्स्प्लोर

David Warner on Umpire Stats : थेट वर्ल्डकपमध्ये डेव्हिड वाॅर्नरच्या जाहीर मागणीने सगळ्या अंपायर्सच्या छातीत कळ येण्याची वेळ! अशी अचाट मागणी केली तरी काय?

श्रीलंकेविरुद्ध, डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंकाचा चेंडू त्याच्या लेग-स्टंपच्या अगदी जवळ पॅडवर आदळल्याने वॉर्नरला पंच जोएल विल्सन यांनी 11 धावांवर मैदानावर एलबीडब्ल्यू आऊट दिले.

लखनौ : स्टार ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) बॉल-ट्रॅकिंग तंत्रज्ञानावर नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी लखनौमध्ये (Lucknow) श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषक 2023 सामन्यात वादग्रस्त एलबीडब्ल्यू बाद झाल्यानंतर पंचांकडून अधिक जबाबदारीची मागणी त्याने केली. श्रीलंकेविरुद्ध दिलशान मधुशंकाचा चेंडू वॉर्नरच्या लेग-स्टंपच्या अगदी जवळ पॅडवर आदळल्याने वॉर्नरला पंच जोएल विल्सन यांनी 11 धावांवर मैदानावर एलबीडब्ल्यू आऊट दिले. त्याने रिव्ह्यूची मागणी केली. हॉक आय (बॉल ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा एक भाग) ने दाखवले की चेंडू त्याच्या लेग-स्टंपला क्लिप करण्यासाठी पुरेसा आहे. अंपायर कॉल असल्याने ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू ठेवला, पण वॉर्नरने मैदानातून बाहेर पडताना संतप्त प्रतिक्रिया दिली.

पंचांची कामगिरी मोठ्या स्क्रीनवर दाखवावी

दरम्यान, डेव्हिड वॉर्नरने आज बोलताना या सर्व पार्श्वभूमीवर मोठी मागणी केली. पंचांनी त्यांच्या कारकिर्दीत किती निर्णय बरोबर दिले आणि किती चुकीचे दिले यांची सांख्यिकी (एकूण कामगिरी) मोठ्या स्क्रीनवर दाखवावी. तसेच सोमवारी झालेल्या प्रकारानंतर तो नाराज का होता हे स्पष्ट केले. राग तंत्रज्ञानावर जास्त होता आणि पंच विल्सन यांच्या अंगुलीनिर्देश केलं नसल्याचे त्याने सांगितले. वॉर्नर म्हणाला की, मी जोएल यांना विचारले की मी बाहेर असताना काय झाले, आउट का दिले, ते म्हणाले की, चेंडू परत स्विंग होत होता. जर त्यांना असे वाटत असेल म्हणून हा निर्णय दिला, तर मग रिप्ले पाहिल्यावर तुम्हाला थोडासा राग येतो. ते नियंत्रणाबाहेर आहे. 

तेव्हा त्यांची आकडेवारीही बोर्डवर येताना मला आवडेल

तो पुढे म्हणाला की, मला काय पहायचं आहे या संदर्भात बरंच काही सांगायचं आहे. हे कदाचित समोर येणार नाही. परंतु, तुम्ही फलंदाजीसाठी येताना आकडेवारी बोर्डवर जाते. जेव्हा ते पंचांची घोषणा करतात आणि ते पडद्यावर येतात, तेव्हा त्यांची आकडेवारीही बोर्डवर पाहण्यास आवडेल. कारण आपण ते NRL (नॅशनल रग्बी लीग) मध्ये पाहतो. NRL ती आकडेवारी दाखवते. मला वाटते की NFL (नॅशनल फुटबॉल लीग) ही आकडेवारी तसेच दर्शवते. मला वाटते की प्रेक्षकांसाठी देखील हे पाहणे खूप मोठी गोष्ट आहे. साहजिकच खराब कामगिरीमुळे खेळाडूंना वगळले जाते. पॅनेलमध्ये काय चालले आहे हे आम्हाला कधीही स्पष्ट केले जात नाही. प्रेक्षकांना दाखविण्यासाठी फक्त छोट्या गोष्टी असल्या तरी ते सोपे नाही, असेही त्याने सांगितले. 36 वर्षीय वाॅर्नरने सांगितले की पंचांच्या आयसीसी एलिट पॅनेलमध्ये कोणतेही पक्षपाती निर्णय घेणारे नाहीत, परंतु त्यांच्याकडून अधिक जबाबदारी हवी आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
Vaibhav Sooryavanshi India Debut : रोहित-विराटसोबत वैभव सूर्यवंशी टीम इंडियामध्ये कधी खेळताना दिसणार?; BCCI ने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?
रोहित-विराटसोबत वैभव सूर्यवंशी टीम इंडियामध्ये कधी खेळताना दिसणार?; BCCI ने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?
Virat Anushka Dance Viral: RCBच्या विजयानंतर विराट-अनुष्काचा धमाकेदार डान्स Viral; अनुष्काच्या पोस्टसह विराटच्या टी-शर्टची चर्चा
RCBच्या विजयानंतर विराट-अनुष्काचा धमाकेदार डान्स Viral; अनुष्काच्या पोस्टसह विराटच्या टी-शर्टची चर्चा
Virat Kohli-Shubman Gill : शुभमन गिलचा IPL फायनलमधील वादग्रस्त कॅच, विराट कोहलीही रागाने लाले लाल; शेवटी थर्ड अंपायरने केली मध्यस्थी
शुभमन गिलचा IPL फायनलमधील वादग्रस्त कॅच, विराट कोहलीही रागाने लाले लाल; शेवटी थर्ड अंपायरने केली मध्यस्थी

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Embed widget