एक्स्प्लोर

World Cup 2019 Final : क्रिकेटविश्वाला मिळणार नवा विजेता!

ज्या लॉर्ड्सवर क्लाईव्ह लॉइड, कपिल देव आणि स्टीव्ह वॉने विश्वचषक उंचावला त्या पंक्तीत आता कोणाचा समावेश होणार? न्यूझीलंडचा केन विल्यम्सनचा की इंग्लंडच्या ऑइन मॉर्गन?

मुंबई : लंडनचे ऐतिहासिक लॉर्डस क्रिकेट स्टेडियम पाचव्यांदा (1975, 1979, 1983, 1999 आणि आता 2019) विश्वचषक विजयाचे साक्षीदार ठरणार आहे. ज्या लॉर्ड्सवर क्लाईव्ह लॉइड, कपिल देव आणि स्टीव्ह वॉने विश्वचषक उंचावला त्या पंक्तीत आता कोणाचा समावेश होणार? न्यूझीलंडचा केन विल्यम्सनचा की इंग्लंडच्या ऑइन मॉर्गन? विश्वचषकाच्या फायनलच्या निमित्ताने न्यूझीलंड आणि इंग्लंड हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे या दोन्ही संघांची विश्वचषकातली विजेतेपदाची पाटी अद्याप कोरीच आहे. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात क्रिकेटजगताला एक नवा विजेता मिळणार आहे. 2015 च्या विश्वचषकात ब्रॅन्डन मॅक्युलमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने पहिल्यांदाच विश्वचषकाची फायनल गाठली होती. दुर्दैवानं न्यूझीलंडच्या विजेतेपदाच्या त्या स्वप्नावर ऑस्ट्रेलियाने पाणी फेरले. पण स्टीफन फ्लेमिंग आणि ब्रॅन्डन मॅक्युलमचा वारसा यशस्वीरित्या चालवणाऱ्या केन विल्यम्सनने न्यूझीलंडला पुन्हा एकदा विश्वचषकाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. दुसरीकडे इंग्लंडनं तब्बल 27 वर्षांनी विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. इंग्लंडचा सध्याचा संघ हा सर्व आघाड्यांवर मजबूत मानला जातोय. त्यामुळे विश्वचषकाची अंतिम लढत चुरशीची होईल, यात तीळमात्र शंका नाही. विश्वचषकाच्या मैदानात न्यूझीलंड आणि इंग्लंड संघांमध्ये आजवर नऊ सामने खेळवण्यात आले आहेत. त्यात पाच सामने न्यूझीलंडने तर चार सामन्यांत इंग्लंडने बाजी मारली आहे. या आकडेवारीवरुन न्यूझीलंडचं पारडं जड दिसत असलं तरी यंदाच्या विश्वचषकातल्या साखळी फेरीत इंग्लंडकडून विल्यम्सनच्या फौजेला तब्बल 119 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. म्हणूनच फायनलसाठी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध काय रणनिती आखणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 2011 आणि 2015 च्या विश्वचषकात यजमान संघांनी विजेतेपदाचा मान मिळवला आहे. 2011 ला भारताने तर 2015 ला ऑस्ट्रेलियाने मायदेशातीस विश्वचषक पटकावला होता. यंदाही यजमान इंग्लंडचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन विश्वचषकातला तो योग पुन्हा जुळून येणार की न्यूझीलंड ती परंपरा मोडीत काढणार? याचीच आता उत्सुकता आहे. परंतु न्यूझीलंड जिंको वा इंग्लंड क्रिकेटविश्वाला एक नवा विजेता मिळणार एवढं मात्र नक्की.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test : पहिली कसोटी पावसाने घातला घोळ; सामना ड्रॉ झाला तर टीम इंडिया WTC च्या शर्यतीतून OUT?, जाणून घ्या फायनलचं समीकरण
पहिली कसोटी पावसाने घातला घोळ; सामना ड्रॉ झाला तर टीम इंडिया WTC च्या शर्यतीतून OUT?, जाणून घ्या फायनलचं समीकरण
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
ODI World Cup 2027 : क्रिकेट वर्ल्डकपसाठी ICCचा मास्टरप्लॅन; महात्मा गांधींना अशी देणार अनोखी श्रद्धांजली? जय शाह मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
क्रिकेट वर्ल्डकपसाठी ICCचा मास्टरप्लॅन; महात्मा गांधींना अशी देणार अनोखी श्रद्धांजली? जय शाह मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
IND vs SL 1st Test DAY-2 Live : गॉलमध्ये आभाळ फाटलं, भारत-श्रीलंका कसोटीला ब्रेक! दुसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र पावसाने धुतलं, मॅच कधी होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट्स
गॉलमध्ये आभाळ फाटलं, भारत-श्रीलंका कसोटीला ब्रेक! दुसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र पावसाने धुतलं, मॅच कधी होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट्स

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Embed widget