पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे बिगुल वाजले; वेळापत्रक जाहीर
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) पाच वर्षांसाठी ‘फ्यूचर टूर प्लॅन’ (एफटीपी) जाहीर केला. आयसीसीने जाहीर केलेल्या एफटीमध्ये (2018-2023) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसह वनडे लीग आणि दोन देशांमधील विविध स्पर्धांचेही वेळापत्रक जाहीर केले.

मुंबई : आयसीसीने पुढील पाच वर्षांसाठीच्या क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावेळी क्रिकेट चाहत्यांमध्ये सर्वाधिक उत्सुकता असणाऱ्या पहिल्या ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’चाही समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) पाच वर्षांसाठी ‘फ्युचर टूर प्लॅन’ (एफटीपी) जाहीर केला. आयसीसीने जाहीर केलेल्या एफटीमध्ये (2018-2023) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसह वनडे लीग आणि दोन देशांमधील विविध स्पर्धांचेही वेळापत्रक जाहीर केले.
कशी असेल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप?
कसोटी क्रमवारीतील अव्वल नऊ संघामध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. 15 जुलै 2019 ते 30 एप्रिल 2021 यादरम्यान होणाऱ्या या टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक संघाचे तीन सामने त्यांच्या मायदेशात तर तीन सामने परदेशात खेळवले जातील.
अंतिम सामना क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंडच्या लॉर्डस मैदानात होईल.
वनडे लीगचीही घोषणा
कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या बारा देशांसह नेदरलॅण्डचा समावेश असणारी ‘वन डे लीग’ 1 मे 2020 ते 31 मार्च 2022 या दरम्यान होईल. या स्पर्धेत सहभागी असेलेला प्रत्येक संघ दोन वर्षांत मायदेशात आणि परदेशात मिळून आठ मालिका खेळेल.
2023 ला होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्रता फेरी असलेली ‘वनडे लीग ‘हा क्रिकेटमधील आधुनिक प्रयोग आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल ठरणारे सात संघ विश्वचषकासाठी पात्र ठरतील. तर भारतात हा विश्वचषक असल्याने भारताला थेट प्रवेश मिळेल. उर्वरित पाच संघांना विश्वचषकात प्रवेश मिळवण्यासाठी पात्रता फेरीद्वारे दुसरी संधी देण्यात येईल .
आयसीसीने आपल्या फ्युचर टूर कार्यक्रमात अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्याचा समावेश केला आहे. अफगाणिस्तानचा संघ 2020 मध्ये कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे.
Before You Go
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला






















