एक्स्प्लोर

IND vs SL : कर्णधार KL राहुलची मोठी चूक, कुलदीप यादवने थेट डोकं पकडलं; LIVE सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

KL Rahul Drops Simple Catch Off Kuldeep Yadav : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 15 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.

KL Rahul Drops Simple Catch Off Kuldeep Yadav : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 15 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी दोन्ही संघ तयारीला लागले असून भारत आणि श्रीलंका इलेव्हन यांच्यात तीन दिवसीय सराव सामना खेळवला जात आहे. कोलंबोतील नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांना सुरुवातीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यातच एक सोपा झेल सुटल्याने फिरकीपटू कुलदीप यादवचा संताप अनावर झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भारतीय गोलंदाजांची निराशाजनक सुरुवात (IND Vs SL Practice Match) 

दुखापतीमुळे नियमित कर्णधार शुभमन गिल या सराव सामन्यात खेळण्यासाठी मैदानात उतरला नाही. श्रीलंका इलेव्हनचा कर्णधार सोनल दिनुषासोबत त्याने टॉस केला. टॉसमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला आणि श्रीलंका इलेव्हनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंका इलेव्हनच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना सुरुवातीपासूनच चांगलेच धारेवर धरले. तब्बल 40 षटकांपर्यंत भारताला एकही फलंदाज बाद करता आला नाही. भारताला पहिले यश धावबादच्या स्वरूपात मिळाले. त्यानंतर रवींद्र जाडेजाने 40.4 षटकांत श्रीलंका इलेव्हनचा दुसरा बळी घेत भारताला दिलासा दिला. पहिले यश 20.4 षटकांत 110 धावांवर धावबादच्या रूपाने मिळाले होते. चहापानापर्यंत श्रीलंका इलेव्हनने 59.3 षटकांत 4 बाद 246 धावा केल्या होत्या.

केएल राहुलने सोडला सोपा झेल अन्... (KL Rahul Drops Simple Catch)

या सामन्यातील 26व्या षटकातील एक प्रसंग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. कुलदीप यादव गोलंदाजी करत होता, तर यष्टिरक्षणाची जबाबदारी ऋषभ पंतकडे होती. स्लिपमध्ये केएल राहुल उभा होता. षटकातील तिसऱ्या चेंडूवर श्रीलंका इलेव्हनचा फलंदाज रविंदू रसंथा याने बचावात्मक फटका खेळला. चेंडू बॅटची कड घेऊन थेट स्लिपमध्ये उभ्या असलेल्या केएल राहुलकडे गेला. मात्र राहुलला हा अगदी सोपा झेल पकडता आला नाही आणि त्याने संधी गमावली.

त्यावेळी भारताला विकेटची नितांत गरज होती. त्यामुळे झेल सुटताच कुलदीप यादव स्पष्टपणे नाराज झालेला दिसला. त्याने तात्काळ निराशा व्यक्त केली आणि राहुलकडे पाहत आपल्या भावना लपवल्या नाहीत. हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये झेल सुटल्यानंतर कुलदीप यादवची प्रतिक्रिया स्पष्टपणे दिसत असून क्रिकेटप्रेमींमध्ये त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. भारताला सराव सामन्यात लवकर विकेट्स मिळत नसल्याने गोलंदाजांवर आधीच दबाव होता. अशा परिस्थितीत आलेली सोपी झेलची संधी हुकल्याने कुलदीपची नाराजी स्वाभाविक मानली जात आहे. आगामी कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघातील क्षेत्ररक्षणाबाबतही या घटनेनंतर चर्चा रंगू लागली आहे.

हे ही वाचा -

Sarfaraz Khan : 6 कसोटी मॅचनंतर वनवास... सरफराज अखेर बोललाच! 16 शब्दांच्या पोस्टमधून सांगितली सगळी कहाणी, काय म्हणाला?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL : कर्णधार KL राहुलची मोठी चूक, कुलदीप यादवने थेट डोकं पकडलं; LIVE सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
कर्णधार KL राहुलची मोठी चूक, कुलदीप यादवने थेट डोकं पकडलं; LIVE सामन्यात नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Sarfaraz Khan : 6 कसोटी मॅचनंतर वनवास... सरफराज अखेर बोललाच! 16 शब्दांच्या पोस्टमधून सांगितली सगळी कहाणी, काय म्हणाला?
6 कसोटी मॅचनंतर वनवास... सरफराज अखेर बोललाच! 16 शब्दांच्या पोस्टमधून सांगितली सगळी कहाणी, काय म्हणाला?
IND vs SL : कॅच सुटले, विकेटही नाही...; श्रीलंकेत पहिल्याच सत्रात गंभीरच्या पोरांचं पितळ उघडं पडलं, लाज वाटावी अशी कामगिरी
कॅच सुटले, विकेटही नाही...; श्रीलंकेत पहिल्याच सत्रात गंभीरच्या पोरांचं पितळ उघडं पडलं, लाज वाटावी अशी कामगिरी
Hardik Pandya Trade IPL 2027 : 25 कोटी अन् थेट कर्णधारपद...; हार्दिक पांड्यासाठी इतिहासातील सर्वात मोठी डील, कोणत्या संघाने दिली ऑफर?, सगळेच हैराण
25 कोटी अन् थेट कर्णधारपद...; हार्दिक पांड्यासाठी इतिहासातील सर्वात मोठी डील, कोणत्या संघाने दिली ऑफर?, सगळेच हैराण
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget