एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
क्रिकेटपटू मोहम्मद शमीला मोठा दिलासा, अटक वॉरंटला स्थगिती
शमीची पत्नी हसीन जहाँने मागील वर्षी त्याच्याविरोधात मारहाण, लैंगिक छळ, हत्येचा प्रयत्न आणि कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करुन गुन्हा नोंदवला होता. दोघांच्या घटस्फोटाचा खटलाही कोर्टात सुरु आहे.
कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला पश्चिम बंगालमधील जिल्हा न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. कौटुंबिंक हिंचासाराप्रकरणी जारी केलेल्या अटक वॉरंटला अलीपूर जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मोहम्मद शमीची पत्नी हसीनाने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचार आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे. मागील आठवड्यात कोर्टाने शमी आणि त्याचा भाऊ हासीद अहमदविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं.
कोर्टाने आपल्या आदेशात मोहम्मद शमीला 15 दिवसांच्या आत आत्मसमर्पण करण्यास सांगितलं होतं. शमीचे वकील सलीम रहमान यांनी सांगितलं की, अलीपूर जिल्हा न्यायाधीश राज चट्टोपध्याय यांनी शमीच्या अटक वॉरंटला स्थगिती दिली. या खटल्याची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीविरोधात अटक वॉरंट जारी
मोहम्मद शमीवरील आरोप
शमीची पत्नी हसीन जहाँने मागील वर्षी त्याच्याविरोधात मारहाण, लैंगिक छळ, हत्येचा प्रयत्न आणि कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करुन गुन्हा नोंदवला होता. दोघांच्या घटस्फोटाचा खटलाही कोर्टात सुरु आहे. हसीन जहाँने शमीवर भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगचा गंभीर आरोप केल्यानंतर दोघांच्या संबंधांत कटुता आली होती. मात्री बीसीसीआयच्या तपास समितीने शमीला आरोपांमधून क्लीन चिट देऊन हसीनचे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं होतं.
तर मोहम्मद शमीनेही हसीन जहाँचे सर्व आरोप खोटे असल्याचं सांगितलं होतं. माझी प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने तिने हे आरोप केल्याचं शमीने म्हटलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
राजकारण
Advertisement