एक्स्प्लोर
Advertisement
वर्ल्ड हॉकी लीग : भारताकडून पाकिस्तानचा 6-1 ने धुव्वा
लंडन : वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पाचव्या-आठव्या स्थानासाठी खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6-1 ने धुव्वा उडवला. पाचव्या स्थानासाठी भारताचा सामना आता कॅनडाशी होईल. 25 जून रोजी हा सामना होणार आहे.
पाकिस्तानविरोधात भारतीय संघाचा हा सलग दुसरा विजय आहे. साखळी सामन्यात 18 जूनला भारताने पाकिस्तानवर 7-1 ने मात केली होती.
भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत सामन्यावर पकड मजबूत ठेवली. पाकिस्तानला विजयाच्या आशाही दिसू दिल्या नाही. पाकला केवळ एका गोलवर समाधान मानावं लागलं. सामन्याच्या 41 व्या मिनिटाला पाकिस्तानला पहिला गोल करता आला.
यास्पर्धेनंतर वर्ल्ड हॉकी लीग फायनल आणि हॉकी विश्वचषक या स्पर्धा भारतात होणार आहेत. या स्पर्धेतील कामगिरीचा भारताच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही, यजमान देश म्हणून भारताचा दोन्ही स्पर्धांमधला प्रवेश निश्चीत आहे. मात्र अखेरच्या सामन्यात विजय मिळवत आत्मविश्वासाने भारतात परतण्याचा भारतीय संघाचा मानस असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement