एक्स्प्लोर

India vs Japan : हॉकी विश्वचषकात आज भारत मैदानात; जपानविरुद्ध खेळणार सामना, कधी, कुठे पाहाल सामना?

IND vs JPN : क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत होऊन भारतीय संघ हॉकी विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पण आता नवव्या ते सोळाव्या स्थानासाठीच्या सामन्यात भारत मैदानात उतरणार आहे.

Hockey World Cup 2023 Live Streaming : भारतीय भूमीत सुरु हॉकी विश्वचषक (Hockey World Cup 2023) स्पर्धेत भारतीय हॉकी संघ ( hockey Team India) क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत होऊन स्पर्धेबाहेर गेला आहे. पण आजपासून (26 जानेवारी) सुरु होणाऱ्या वर्गीकरण सामन्यात भारत मैदानात उतरणार आहे. टॉप 8 मध्ये जागा न मिळवू शकलेल्या संघात नवव्या ते सोळाव्या स्थानासाठी सामने खेळवले जाणार असून यामध्ये भारत आज मैदानात जपानविरुद्ध उतरणार आहे. 

भारताचं पारडं जड

यंदाच्या विश्वचषकाचा विचार करता भारताचं पारडं जपानपेक्षा जड आहे. जपानचा संघ पूल-बीमध्ये शेवटच्या स्थानावर राहिला. त्यांना बेल्जियम, जर्मनी आणि दक्षिण कोरियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. भारताच्या तुलनेत जपानचा संघ खूपच कमकुवत आहे. अशा स्थितीत आज भारतीय संघ विजयाची नोंद करू शकतो, असे मानले जात आहे. कारण भारतीय संघाने या विश्वचषकात पूल स्टेजवर स्पेन आणि वेल्सचा पराभव केला आणि इंग्लंडसोबत बरोबरी खेळली. त्याचवेळी, न्यूझीलंडविरुद्धच्या क्रॉसओव्हर सामन्यात त्याला पेनल्टी शूटआऊटमध्ये थरारक पराभवाला सामोरे जावे लागले आणि तो विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला. तर आजच्या भारत विरुद्ध जपान सामन्याची माहिती जाणून घेऊ...

कधी होणार सामना?

भारत विरुद्ध जपान हा हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारताचा सामना गुरुवारी 26 जानेवारी रोजी होणार आहे. राउरकेला येथील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार सायकांळी 7 वाजता सामना खेळवला जाईल. 

कुठे पाहता येणार सामना?

भारत विरुद्ध जपान या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.  

कसा आहे भारतीय संघ?

अभिषेक, सुरेंदर कुमार, मनप्रीत सिंग, जर्मनप्रीत सिंग, मनदीप सिंग, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), ललित उपाध्याय, कृष्ण पाठक, निलम संजीप एक्सेस, पीआर श्रीजेश, नीलकांत शर्मा, शमशेर सिंग, वरुण कुमार, आकाशदीप सिंग, अमित रोहिदास (उपकर्णधार), विवेक सागर प्रसाद आणि सुखजीत सिंग.

कसं आहे उर्वरीत सामन्यांचं वेळापत्रक?

 26 जानेवारी

प्लेसमेंट सामने (9 व्या ते 16 व्या क्रमांकासाठी)

27 जानेवारी
पहिला सेमी-फायनल: भुवनेश्वर – सायंकाळी  4:30 वाजता
दुसरा सेमी-फायनल: भुवनेश्वर – सायंकाळी  7 वाजता

29 जानेवारी
ब्रॉन्ज मेडल सामना– सायंकाळी  4:30 वाजता
सुवर्णपदकासाठीचा फायनल सामना – सायंकाळी  7 वाजता

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Rohit Pawar: ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी,आध्यात्मिक अनुभव :19 मे 2024TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime : कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
कोण होणार सांगलीचा खासदार? पैज लावणं आलं अंगलट; गाड्यांची पैज लावणाऱ्या 'त्या' दोघांवर गुन्हा दाखल!
Balumamachya Navan Changbhala : 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं'; उलगडणार बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा
Akola News : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात बिबट्याचा मुक्त संचार; वन विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
Rohit Pawar: ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
ईव्हीएम मशीनवर मतदान करताना 'त्या' व्यक्तीकडून नागरिकांवर दबाव, रोहित पवारांचा भाजपवर आरोप
Weather Update : सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
हवामान अपडेट: सावध रहा! आज तापमान 47 अंशांवर पोहोचू शकते; 'या' राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी
Pune Khed Gas Cylinder Blast : गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
गॅस चोरीचा गोरखधंदा सुरुच; गॅस चोरी करताना एकामोगामाग एक भीषण स्फोट, खेड तालुक्यातील धक्कादायक घटना
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
84 वर्षांच्या म्हाताऱ्याचं एक वाक्य अन् अख्खी यंत्रणा हलवली, तरुण तडफदार IAS अधिकाऱ्याने काय केलं पाहा!
Mumbai Local Train: मुंबईत लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक, फास्ट ट्रेन स्लो ट्रॅकला वळवणार, हार्बर लाईनच्या वेळापत्रकातही महत्त्वाचे बदल
मुंबईत लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक, फास्ट ट्रेन स्लो ट्रॅकला वळवणार, हार्बर लाईनच्या वेळापत्रकातही महत्त्वाचे बदल
Embed widget