एक्स्प्लोर
Advertisement
सारा तेंडुलकरकडून शुभमन गिलचं अभिनंदन, हार्दिक पंड्या म्हणतो...
इन्स्टाग्रामवर आपल्या शानदार गाडीचा फोटो शुभमनने शेअर केला. त्यावर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने शुभमनला 'काँग्रॅच्युलेशन्स' केलं.
मुंबई : युवा क्रिकेटपटू शुभमन गिलने अंडर 19 क्रिकेट विश्वचषकात चमकदार कामगिरी करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर टीम इंडियामध्ये शुभमनची वर्णी लागलेली नसली, तरी सिलेक्टर्सची त्याच्यावर नजर असल्याचं म्हटलं जातं. त्यातच, सोशल मीडियावर शुभमनने एक फोटो अपलोड केला, त्यावर चक्क मास्टर ब्लास्टरच्या लेकीने कमेंट केली आणि सुरु झाली शुभमनची खिचाई!
19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात शुभमनने 372 धावा ठोकल्या होत्या. यात सेमी फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात झळकवलेल्या शतकाचाही समावेश आहे. मालिकावीराचा किताब जिंकल्यानंतर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडरमध्ये गिलने स्थान मिळवलं. 14 सामन्यांमध्ये 296 धावा त्याने ठोकल्या. आपल्या कमाल कामगिरीनंतर 'ये तौफा हमने खुद को दिया है' स्टाईलमध्ये स्वतःला शानदार रेंज रोवर कार गिफ्ट केली.
VIDEO | रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड 'माझा'वर | खेळ माझा
इन्स्टाग्रामवर आपल्या शानदार गाडीचा फोटो शुभमनने शेअर केला. त्यावर 'थाले मेरे रंगे अंख बाज नालो तेज' असं पंजाबी कॅप्शनही दिली. त्यावर चाहत्यांनी धडाधड शुभेच्छांचा वर्षाव केला. यामध्ये एक वेगळी कमेंट होती, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकरची. साराने शुभमनला 'काँग्रॅच्युलेशन्स' केलं.
साराच्या मेसेजला शुभमनने 'थँक यू' असा रिप्लाय केला. इतकंच नाही, तर त्यापुढे 'पिंक हार्ट'ची इमोजीही टाकली. त्यामुळे अनेकांच्या भुवया विस्फारल्याच. मात्र क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने न राहवून त्यावर रिप्लायही केला. 'साराच्या वतीने वेलकम बॅक' असं म्हणत पंड्याने शुभमनचा पाय खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावर चाहत्यांनी पंड्याच्या उत्स्फूर्तपणाला मनमोकळी दाद दिली आहे.View this post on InstagramThalle mere Range akh baaz naalo tezz! Caption credits- @jassie.gill ????
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement