एक्स्प्लोर
VIDEO : सामन्याला कलाटणी देणारा पंड्याचा भन्नाट 'थ्रो'
हार्दिक पंड्याने केलेल्या एका थ्रो ने संपूर्ण सामना भारताच्या बाजूने झुकला.
पोर्ट एलिझाबेथ: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात 73 धावांनी दणदणीत विजय मिळवत भारताने मोठा इतिहास रचला. या सामन्यात रोहित शर्माने झळकावलेल्या शानदार शतकामुळे भारत 274 धावांपर्यंत मजल मारु शकला. त्यानंतर कुलदीप यादवच्या फिरकीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अक्षरश: लोटांगण घातलं. पण या सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट ठरला तो हार्दिक पंड्याने केलेला एक थ्रो!
हार्दिक पंड्याने केलेल्या एका थ्रो ने संपूर्ण सामना भारताच्या बाजूने झुकला. 34 व्या षटकात हाशिम अमला आणि विकेटकीपर क्लासेन फलंदाजी करत होते. मिलरच्या विकेटनंतर या दोघांनीही 39 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली होती. त्यामुळे सामना दोलायमान स्थितीत होता. त्याचवेळी भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर आमलाने मिड ऑफवर एक जोरदार फटका मारला आणि एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला.
याचवेळी हार्दिक पंड्याने प्रचंड चपळतेने चेंडू स्टम्पवर फेकला. त्यावेळी 71 धावांवर असलेला हाशिम अमला क्रिझमध्येही पोहचला नव्हता. त्यामुळे त्याला पव्हेलियनमध्ये परतावं लागलं. हार्दिकने डायरेक्ट हिट मारुन अमलाला बाद केलं आणि दक्षिण आफ्रिकेच्या उरल्यासुरल्या आशांनाही सुरुंग लावला.
आमलाने 92 चेंडूत 71 धावांची महत्त्वूपर्ण खेळी केली. पण त्याचं धावबाद होणं हाच या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. कारण अमला आणि क्लासेनने 200 धावांचा टप्पा संघाला गाठून दिला असता तर सामना आणखी रंगतदार झाला असता. पण अमलाच्या विकेटनंतर उर्वरित दक्षिण आफ्रिकेच्या संघाने एकूण धावसंख्येत फक्त 35 धावांचीच भर घातली. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ 201 धावांवरच बाद झाला.
VIDEO :
Watch: Hardik Pandya का Hashim Amla को आउट करने वाला शानदार रन-आउट. #INDvSA @BCCI @OfficialCSA @hardikpandya7 pic.twitter.com/Kb8laSCt13
— Vipin Kirad (@VipinKirad) February 14, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement