एक्स्प्लोर
Advertisement
कोच कुंबळेकडून हार्दिक पांड्यावर कौतुकाचा वर्षाव!
हैदराबाद: टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेनं टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचं कौतुक केलं असून कसोटी क्रिकेटच्या भविष्यातील एक खेळाडू म्हणून त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.
उद्यापासून बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळविण्यात येणार आहे. त्यापूर्वी कुंबळे म्हणाला की, 'संघाचं संतुलन राखण्यासाठी पांड्याचा संघात समावेश करणं गरजेचं आहे.'
23 वर्षीय पांड्यानं आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं नाही. पण मागील काही दिवसांपासून पांड्या वनडे आणि टी20 मध्ये आपली भूमिका चोखपणे बजावत आहे.
पांड्याबाबत बोलताना कुंबळे म्हणाला की, 'हार्दिकला आम्ही संघात ठेऊ इच्छितो कारण की, कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू कामगिरी करण्याची त्याच्या क्षमता आहे. असं फार कमी पाहायला मिळतं की, 140 प्रति किमी वेगानं गोलंदाजी करणारा गोलंदाज तेवढीच चांगली फलंदाजीही करतो.'
'बांगलादेशनं नुकतंच न्यूझीलंडविरुद्ध चांगली कामगिरी केली. भले निर्णय त्यांच्याविरुद्ध लागला असला तरीही त्यांचे काही अष्टपैलू खेळाडू भारतीय संघाला नक्कीच आव्हान देऊ शकतील.' असंही कुंबळे म्हणाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भारत
भारत
Advertisement