एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तीन वेळा चॅम्पियन बनवलं, पण आता त्याच संघाविरोधात दंड थोपटणार!
आयपीएल – 11 साठी सर्वच संघ नव्या खेळाडूंसह मैदानात उतरतील. टूर्नामेंटमधील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्डेडिअमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होईल.
मुंबई : आयपीएलचा अकरावा मोसम सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. आयपीएल – 11 साठी सर्वच संघ नव्या खेळाडूंसह मैदानात उतरतील. टूर्नामेंटमधील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्डेडिअमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होईल.
हा सामना अत्यंत चुरशीचा होईल, यात कोणतीही शंका नाही. कारण, उभय संघांमधील खेळाडूंची अदलाबदली झाली आहे. तर दोन वर्षांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर पुनरागमन करत असलेला चेन्नई सुपरकिंग्जचा संघ विजयासाठी उत्सुक असेल.
या संघात एक खेळाडू आहे हरभजन सिंह. तो यावेळी चेन्नईकडून खेळताना दिसणार आहे. हरभजन सिंह तीन वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सकडून गेल्या दहा मोसमांपासून खेळत आहे. मात्र तो आता होम ग्राऊंडवर मुंबईच्याच विरोधात खेळण्यासाठी उतरणार आहे.
दरम्यान, वानखेडेवर मुंबई आणि चेन्नई यांच्यातील आकडे पाहिले तर मुंबई इंडियन्सचं पारडं जड दिसून येतं. उभय संघांनी आयपीएलमध्ये एकमेकांविरोधात आतापर्यंत 24 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये मुंबईने 13 सामन्यात विजय मिळवला, तर सीएसकेने 11 सामने जिंकले.
मुंबईत चेन्नईचे आकडे निराशाजनक आहेत. दोन्ही संघ मुंबईत 10 वेळा एकमेकांविरोधात भिडले. ज्यामध्ये सहा वेळा मुंबई, तर चार वेळा चेन्नईने विजय मिळवला.
हरभजन सिंहला चेन्नईने त्याची बेस प्राईज 2 कोटींमध्ये खरेदी केलं. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत एकूण 136 सामने खेळले आहेत. 6.95 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करताना त्याने 127 विकेट घेतल्या आहेत. तर 140.95 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत त्याच्या खात्यात 771 धावा आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement