एक्स्प्लोर

Gurnoor Brar: पहिल्याच ओव्हरमधील पाचव्या बाॅलवर विकेट घेत गुरनूर ब्रारची टीम इंडियात धडाकेबाज एन्ट्री!

Gurnoor Brar: गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे धर्मशालातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. अफगाणिस्तानच्या भारत दौऱ्यादरम्यान दोघांचीही पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात निवड झाली आहे.

Gurnoor Brar: टीम इंडियात गुरनूर ब्रारचे आंतरराष्ट्रीय पदार्पण स्वप्नवत ठरले आहे. आपल्या पहिल्याच षटकात पाचव्या चेंडूवर त्याने इब्राहिम झद्रानच्या रूपाने अफगाणिस्तानला पहिला धक्का दिला. तो डावाच्या दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आला. त्याने पाचव्या चेंडूवर एक शॉर्ट बॉल टाकला, ज्यावर इब्राहिम झद्रानने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू मिड-ऑफला उभ्या असलेल्या शुभमन गिलच्या हातात विसावला आणि त्याने कोणतीही चूक न करता झेल घेतला. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. पहिला सामना आज, १३ जून रोजी धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे धर्मशालातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. अफगाणिस्तानच्या भारत दौऱ्यादरम्यान दोघांचीही पहिल्यांदाच राष्ट्रीय संघात निवड झाली आणि त्यांनी आपल्या पहिल्याच सामन्यात अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. गुरनूरने आपल्या पहिल्याच षटकात बळी घेत स्वप्नवत पदार्पण केले आणि भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा तिसरा सर्वात उंच गोलंदाज ठरला.

गुरनूर ब्रारची उंची 6 फूट 5 इंच 

गुरनूर ब्रारला कर्णधार शुभमन गिलने पदार्पणाची संधी दिली. 26 वर्षीय ब्रा र हा देखील पंजाबचाच आहे. त्याचा जन्म 25 मे 2000 रोजी मुक्तसर येथे झाला. तो वेगवान गोलंदाज आहे. 6 फूट 5 इंच उंची असलेला तो इशांत शर्मापेक्षा उंच आहे. गुरनूरने 2023 मध्ये आपला एकमेव आयपीएल सामना खेळला. त्या सामन्यात त्याने पंजाब किंग्ससाठी तीन षटके टाकली, मात्र त्याला एकही बळी घेता आला नाही. तथापि, त्याने आपल्या पहिल्याच षटकात इब्राहिम झद्रानला बाद करून दमदार आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे.

हर्ष दुबे अष्टपैलू खेळाडू  

दरम्यान, हर्ष दुबेचा जन्म 23 जुलै 2002 रोजी पुणे येथे झाला. हा 23 वर्षीय गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू देशांतर्गत स्तरावर विदर्भ संघाकडून खेळतो. तो डावखुरा फलंदाज असून डावखुरा गोलंदाजही आहे. हर्षने आयपीएल 2026 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना 8 सामन्यांमध्ये 8 बळी घेतले. त्याने गेल्या वर्षी एसआरएचकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि 3 सामन्यांमध्ये 5 बळी घेतले.

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Ind vs SL Test Series Schedule : टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
टीम इंडियाच्या वेळापत्रकात अचानक मोठा बदल; श्रीलंका दौऱ्यावर सराव सामना आता 3 दिवसांचाच, नेमकं चाललयं काय?
India vs Pakistan : ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget