एक्स्प्लोर
GC2018 : 249 किलो वजन उचललं, गुरुराजाला रौप्यपदक!
वेटलिफ्टर गुरुराजाने पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली.
![GC2018 : 249 किलो वजन उचललं, गुरुराजाला रौप्यपदक! GC2018: Weightlifter Gururaja wins India's first medal at Commonwealth Games 2018, bagging Silver in men's 56kg category GC2018 : 249 किलो वजन उचललं, गुरुराजाला रौप्यपदक!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/05080821/Gururaj.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सिडनी: ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये सुरु झालेल्या 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पदकांचं खातं उघडलं आहे. वेटलिफ्टर गुरुराजाने पुरुषांच्या 56 किलो वजनी गटात 249 किलो वजन उचलून रौप्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेत गुरुराजाने भारताला मिळवून दिलेलं हे पहिलं पदक ठरलं.
दरम्यान, या वजनी गटात सुवर्ण पदक मलेशियाच्या इजहार अहमदने तर कांस्य पदक श्रीलंकेच्या चतुरंगा लकमलने पटकावलं.
बॅडमिंटनमध्ये विजयी सुरुवात
दरम्यान, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने बॅडमिंटनमध्ये विजयी सुरुवात केली. पहिल्या सामन्यात भारताच्या प्रणव चोप्रा आणि ऋत्विकच्या जोडीने श्रीलंकेच्या जोडीला पराभूत केलं.
तर पुरुष एकेरीमध्ये भारताच्या के श्रीकांतने दुसरा विजय मिळवला.
महिला हॉकीत पराभूत
दुसरीकडे भारतीय महिला हॉकी संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं.
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा
एकविसाव्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा क्वीन्सलँडच्या करारा स्टेडियमवर रंगला. या उद्घाटन सोहळ्याच्या संचलनावेळी पी. व्ही. सिंधूनं भारतीय पथकाचं नेतृत्त्व केलं.
या स्पर्धेसाठी भारताचा 225 खेळाडूंचं पथक सज्ज झालं आहे. गोल्ड कोस्टच्या राष्ट्कुल क्रीडा स्पर्धेत एकूण 19 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यातल्या 14 प्रकारात भारताचा सहभाग असणार आहे. त्यात प्रामुख्यानं अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, नेमबाजी, कुस्ती, स्क्वॉश आणि वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पदकाची अपेक्षा राहिल.
गेल्या चार स्पर्धांमधील भारताची कामगिरी
दरम्यान भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी ही लक्षवेधक ठरली होती. त्यामुळं यंदा गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातूनही भारताला पदकांची मोठी अपेक्षा आहे.
2002... मॅन्चेस्टर... ६९ पदकं, 2006... मेलबर्न... ५० पदकं, 2010... दिल्ली... १०१ पदकं, 2014... ग्लास्गो... ६४ पदकं आणि आता 2018 सालच्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज झालंय २२५ शिलेदारांचं भारतीय पथक.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)