एक्स्प्लोर

रिषभने सुधारणा करावी, पार्थिव पटेलला संधी द्यावी, माजी यष्टीरक्षकांचं मत

भारताच्या माजी यष्टीरक्षकांच्या मते, रिषभला आपल्या खेळात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. पार्थिव पटेल हा यष्टीरक्षक म्हणून चांगला पर्याय असू शकतो.

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पदार्पण करणाऱ्या रिषभ पंतच्या यष्टीरक्षणाने दिग्गजांना निराश केलं आहे. भारताच्या माजी यष्टीरक्षकांच्या मते, रिषभला आपल्या खेळात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. त्याने पाच सामन्यांच्या मालिकेतील सहा डावांमध्ये 76 अतिरिक्त धावा दिल्या. दरम्यान, यातील 20-25 धावांमध्ये रिषभची चूक नव्हती. भारताचे माजी यष्टीरक्षक नयन मोंगिया, किरण मोरे आणि दीप दासगुप्ता यांच्या मते, रिषभला सुधारणा करण्याची गरज आहे. याशिवाय निवडकर्त्यांचंही यष्टीरक्षकाबाबत स्पष्ट धोरण असावं. कारण, रिद्धीमान साहाचंही पुढील तीन ते चार महिने खेळणं शक्य नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. “तो (रिषभ) सध्या नवीन आहे. आयपीएलच्या आधारावर खेळाडूची निवड करणं चुकीचं धोरण आहे. यष्टीरक्षणात त्याच्या बेसिक गोष्टीच बरोबर नाहीत. माझी चिंता ही आहे, की तो इंग्लंडमध्ये फिरकीपटूंसमोर यष्टीरक्षण करु शकत नसेल, तर मायदेशात खेळताना त्याला चौथ्या किंवा पाचव्या दिवशी मोठी अडचण येईल”, असं मोंगिया म्हणाले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी यष्टीरक्षक म्हणून कुणाला संधी द्यावी, असाही प्रश्न मोंगिया यांनी विचारण्यात आला. त्यांनी पार्थिव पटेलचं नाव सुचवलं. “पार्थिव दक्षिण आफ्रिकेत दुसरा यष्टीरक्षक होता. तो प्लॅनमधून कसा बाहेर झाला माहित नाही, पण त्याला संधी दिली पाहिजे आणि हे निवडकर्त्यांवर अवलंबून आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत यष्टीरक्षकांसाठी विशेष शिबिरांचं आयोजन का केलं जात नाही तेच कळत नाही,” असंही ते म्हणाले. निवडकर्ते आगामी मालिकेसाठी अनुभवाला प्राधान्य देतील, असं मत दासगुप्ता यांनी व्यक्त केलं. रिषभला सुधारणा करण्याची गरज आहे. पण एका मालिकेच्या आधारावर खेळाडूला संघातून बाहेर केलं जाऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांच्या मते, रिषभ पंतला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत आणखी एक संधी दिली जावी. तो एक प्रतिभासंपन्न खेळाडू आहे. त्याने अतिरिक्त धावा दिल्या असल्या तरी झेल सोडलेला नाही. यामुळे त्याच्या फलंदाजीवर परिणाम होऊ नये, अशी अपेक्षा किरण मोरे यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 2nd T20 : रांचीत टीम इंडियाचा लाजिरवाणा धुव्वा! कर्णधार अय्यरच्या 'त्या' घोडचुकीनं घातला घोळ; पराभवाची 3 सनसनाटी प्रमुख कारणं
रांचीत टीम इंडियाचा लाजिरवाणा धुव्वा! कर्णधार अय्यरच्या 'त्या' घोडचुकीनं घातला घोळ; पराभवाची 3 सनसनाटी प्रमुख कारणं
Michael Hussey CSK IPL 2027 : चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?
चेन्नई सुपर किंग्समध्ये क्रांतीचे वारे! IPL 2027 पूर्वी आणखी एका मोठ्या नावाची एक्झिट; झहीर खानच्या एन्ट्रीनंतर नेमकं काय घडलं?
Shreyas Iyer IND vs WI 2nd T20 : रांचीमध्ये 249 धावाही कमी पडल्या! वेस्ट इंडिजने भारताला धुतलं, श्रेयस अय्यरने सांगितली भारताची सर्वात मोठी चूक, कुणाकुणाला झापलं?
रांचीमध्ये 249 धावाही कमी पडल्या! वेस्ट इंडिजने भारताला धुतलं, श्रेयस अय्यरने सांगितली भारताची सर्वात मोठी चूक, कुणाकुणाला झापलं?
IND vs WI 2nd T20 : अय्यर-गंभीरचे सर्व डावपेच फ्लॉप! रेकॉर्डब्रेक धावा करूनही भारत हरला, शाई होपने काढला सगळा हिशोब; वेस्ट इंडिजकडून धावांचा ऐतिहासिक पाठलाग
अय्यर-गंभीरचे सर्व डावपेच फ्लॉप! रेकॉर्डब्रेक धावा करूनही भारत हरला, शाई होपने काढला सगळा हिशोब; वेस्ट इंडिजकडून धावांचा ऐतिहासिक पाठलाग

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
Embed widget