Team India : वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच टीम इंडियात तीन बदल होण्याची शक्यता; कोणाला मिळणार संधी?
टीम इंडियाचा उद्या 12 नोव्हेंबरला नेदरलँड्सविरुद्ध सामना होणार आहे. अशा परिस्थितीत या उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आपल्या काही महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती मिळण्याची शक्यता आहे.
ICC Cricket World Cup 2023: या विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाने (Team India) अप्रतिम कामगिरी केली आहे. या संघाने साखळी टप्प्यात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत आणि सर्व सामने जिंकले आहेत. टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ आहे आणि 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. मात्र, टीम इंडियाचा एक साखळी सामना बाकी आहे, तो उद्या 12 नोव्हेंबरला नेदरलँड्सविरुद्ध (India vs Netherlands) होणार आहे. अशा परिस्थितीत या उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आपल्या काही महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देऊ शकेल, अशी अपेक्षा आहे. 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा या तीन खेळाडूंना विश्रांती देऊ शकतो.
Dravid said "Rohit is setting an example - it has been a pleasure to see him operate the way he has done in this World Cup". [PTI] pic.twitter.com/zezTWtAF6D
— Johns. (@CricCrazyJohns) November 11, 2023
जसप्रीत बुमराह
या यादीत पहिले नाव जसप्रीत बुमराहचे आहे. बुमराहने या विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने 8 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत आणि फलंदाजांना प्रत्येकी धावसाठी संघर्ष करण्यास भाग पाडलं आहे. त्याच्या चमकदार गोलंदाजीचा फायदा दुसऱ्या टोकाकडून गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांनाही होतो. अशा परिस्थितीत रोहित सेमीफायनल सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराहला उर्वरित एक सामना देऊ शकतो, जेणेकरून मोठ्या सामन्यापूर्वी बुमराह पूर्णपणे फ्रेश राहील.
Dravid said "Pressure brings the best out of Shreyas Iyer, he has a good temperament - a batsman will have areas to improve but you got to judge him by the runs - he has played some critical knocks". [Indian Express] pic.twitter.com/gyQKAdPph1
— Johns. (@CricCrazyJohns) November 11, 2023
मोहम्मद सिराज
या यादीत दुसरे नाव आहे मोहम्मद सिराजचे. सिराजनेही या विश्वचषकात आतापर्यंतचे सर्व सामने खेळले आहेत. त्याने आतापर्यंत 8 विश्वचषक सामन्यांमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत आणि त्याच्या आक्रमक गोलंदाजीने फलंदाजांना खूप त्रास दिला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार सिराजलाही नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते.
कुलदीप यादव
भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने या विश्वचषकात चांगली कामगिरी केली आहे. त्याने रवींद्र जडेजासह मधल्या षटकांमध्ये विरोधी फलंदाजांना धावा काढण्याची एकही संधी दिली नाही. या विश्वचषकात कुलदीपने आतापर्यंत 8 सामन्यात एकूण 12 विकेट घेतल्या आहेत, आणि खूप कमी धावा दिल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्माही उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी कुलदीपला विश्रांती देऊ शकतात.
इतर महत्वाच्या बातम्या