FIFA WC 2022 Opening Ceremony: नोरा ते बीटएस स्टार जंगकूक; फिफा विश्वचषकाच्या ग्रँड ओपनिंगला हे सेलिब्रिटी करणार परफॉर्म, पाहा संपूर्ण यादी
कतारमध्ये (Qatar) फिफा विश्वचषक 2022 ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या ग्रँड ओपनिंगला अनेक सेलिब्रिटी परफॉर्म करणार आहेत
FIFA WC 2022 Opening Ceremony: फुटबॉल प्रेमी फिफा विश्वचषक (FIFA WC 2022) स्पर्धेची उत्सुकतेने वाट बघत असतात. जगातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा असणाऱ्या फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेला आजपासून (20 नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. कतारमध्ये (Qatar) ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेची ग्रँड ओपनिंग सेरिमनी (FIFA Opening Ceremony) ही लवकर पार पडणार आहे. या ग्रँड ओपनिंगला अनेक सेलिब्रिटी परफॉर्म करणार आहेत. पाहूयात फिफा विश्वचषक 2022 च्या ग्रँड ओपनिंगला परफॉर्म करणाऱ्या सेलिब्रिटींची यादी-
जंगकूक (JungKook)
कोरियन बँड (K-pop Band) बीटीएस मधील सदस्य जंगकूक हा उद्घाटन समारंभात परफॉर्म करणार आहे. फिफा विश्वचषकाच्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करण्यासाठी जंगकूक हा कतारला पोहचला. त्यानंतर ट्वीटरवर #WelcomeToQatarJungkook हा हॅशटॅग ट्रेंड झाला.
ब्लॅक आयड पीस (Black Eyed Peas)
अमेरिकचा म्युझिक ब्लॅक आयड पीस देखील विश्वचषकच्या ग्रँड ओपनिंगला परफॉर्म करणार आहेत. फिफा विश्वचषक 2010 मध्ये देखील या म्युझिक बँडनं परफॉर्म केलं होतं.
नोरा फतेही (Nora Fatehi)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीचा फिफा विश्वचषकच्या ग्रँड ओपनिंगचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी अनेक लोक उत्सुक आहेत. निकी मिनाज सारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत तिने या वर्षी “लाइट द वर्ल्ड” या अधिकृत फीफा एनथममध्ये देखील काम केले.
कोलंबियन गायक जे बाल्विन, नायजेरियन गायक आणि गीतकार पॅट्रिक नेमेका ओकोरी हे देखील फिफा विश्वचषक 2022 च्या उद्घाटन समारंभात परफॉर्म करणार आहेत. अमेरिकन रॅपर लिल बेबीनं सप्टेंबरच्या अखेरीस विश्वचषक 2022 चे अधिकृत गीत रिलीज केले. लिल बेबी देखील फिफाच्या ग्रँड ओपनिंगमध्ये परफॉर्म करणार आहे.
कतारमध्ये होणार्या यंदाची फिफा वर्ल्डकप (FIFA WC 2022) स्पर्धा ही 29 दिवस चालणार असून एकूण 32 संघ या स्पर्धेत सामिल होणार आहेत. या स्पर्धेचे सर्व सामने कतारच्या वेगवेगळ्या आठ स्टेडियममध्ये खेळवले जातील. संपूर्ण विश्वचषकात 64 सामने होणार आहेत. अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ 7-7 सामने खेळतील. Viacom-18 कडे भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: