एक्स्प्लोर

FIFA World Cup 2022 : इंग्लंडचा इराणवर दणदणीत विजय, 6-2 च्या मोठ्या फरकाने दिली मात

Fifa WC 2022 : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात बलाढ्य इंग्लंड संघाने इराणवर एक मोठा विजय मिळवला. तब्बल 6 गोल इंग्लंडनं केले असून सर्वाधिक गोल्स बी. साका याने केले आहेत.

Fifa World Cup 2022 : कतारमध्ये सुरु फिफा विश्वचषक स्पर्धेत  (Fifa WC) इंग्लंड विरुद्ध इराण (England vs Iran) सामना पार पडला. दमदार फॉर्मात असलेल्या बलाढ्य इंग्लंड संघाने इराणला 6-2 अशा मोठ्या फरकाने मात दिली. यावेळी सर्वाधिक गोल्स इंग्लंडच्या बी. साका याने केले, त्याने 2 उत्कृष्ट गोल्स केले. तर इराण संघाकडून मेहदी तरेमी यानेच दोन गोल केले. पात्रता फेरी सामन्यातही त्यानेच संघासाठी सर्वाधिक गोल केले होते. आजही त्याचा फॉर्म दिसून आला. पण इंग्लंडचा खेळ कमालीचा दमदार असल्याने 6-2 ने इराणचा पराभव झाला.

विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने 16 व्या वेळेस स्पर्धेत सहभाग मिळवला आहे. तर इराणचा संघ सहाव्यांदा स्पर्धेत सहभागी होत आहे. विशेष म्हणजे हे दोघेही पहिल्यांदाच मैदानात एकमेंकाविरुद्ध आमने-सामने आले होते. दरम्यान सामना इंग्लंडने जिंकल्याने हेड टू हेड रेकॉर्डमध्ये इंग्लंड 1-0 ने आघाडीवर पोहोचला आहे. सामन्याचा विचार करता इंग्लंड संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. 35 व्या मिनिटाला जुड बेलिंगहमने गोल करत संघाचं खातं उघडलं. त्यानंतर 43 व्या मिनिटाला साकाने गोल केला तर रहीम स्टर्लिंगने हाल्फ टाईमनंतर मिळालेल्या एक्स्ट्रा वेळेत (45+1) गोल केल्यामुळे हाल्फ टाईमपूर्वी 3-0 ची मोठी आघाडी घेतली.

हाल्फ टाईमनंतर 65 व्या मिनिटाला इराणच्या मेहदी तरेमीने गोल केला. पण इराण आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करणार तोवरच 71 स्टार खेळाडू मार्कस रॅशफोर्डने गोल करत इंग्लंडची आघाडी वाढवली. 89 व्या मिनिटाला जॅक ग्रेयलिशने आणखी एक गोल करत इंग्लंडची आघाडी तब्बल 6 गोल केली. ज्यानंतर एक्स्ट्रा टाईममध्ये (90+1) इराणकडून मेहदी तरेमीने पेनल्टीवर गोल केल्यामुळे इराणने 6-2 अशा फरकाने सामना गमावला. या विजयासह इंग्लंड संघाने ग्रुप B मध्ये पहिला विजय मिळवत अव्वल स्थान मिळवलं आहे. त्यांच्या नावावर 3 गुण आले असून मोठ्या गोल फरकाने सामना जिंकल्याने त्यांची गटातील स्थिती मजबूत झाली आहे.

हे देखील वाचा- 

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manisha Mandhare NEET Exam Paper Leak: प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम; संख्याबळामुळे महायुतीचे पारडे जड! अंबादास दानवे, बावनकुळे, धस यांच्यासह 'या' आमदारांच्या जागांवर होणार लढत
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम; संख्याबळामुळे महायुतीचे पारडे जड! अंबादास दानवे, बावनकुळे, धस यांच्यासह 'या' आमदारांच्या जागांवर होणार लढत
IPL 2026 Playoffs Qualification Scenarios: जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
Vidhan Parishad Election NCP Candidates: विधानपरिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'ते' दोन नेते सुनेत्रा पवारांना भेटायला पोहोचले, पुण्यातून कोणाला उमेदवारी मिळणार?
विधानपरिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'ते' दोन नेते सुनेत्रा पवारांच्या भेटीला, पुण्यातून कोणाला उमेदवारी मिळणार?

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manisha Mandhare NEET Exam Paper Leak: प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम; संख्याबळामुळे महायुतीचे पारडे जड! अंबादास दानवे, बावनकुळे, धस यांच्यासह 'या' आमदारांच्या जागांवर होणार लढत
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम; संख्याबळामुळे महायुतीचे पारडे जड! अंबादास दानवे, बावनकुळे, धस यांच्यासह 'या' आमदारांच्या जागांवर होणार लढत
IPL 2026 Playoffs Qualification Scenarios: जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
Vidhan Parishad Election NCP Candidates: विधानपरिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'ते' दोन नेते सुनेत्रा पवारांना भेटायला पोहोचले, पुण्यातून कोणाला उमेदवारी मिळणार?
विधानपरिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'ते' दोन नेते सुनेत्रा पवारांच्या भेटीला, पुण्यातून कोणाला उमेदवारी मिळणार?
Sanju Samson Heinrich Klaasen Fight Video CSK vs SRH IPL 2026: हेनरिक क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजू सॅमसनचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजूचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
PM Narendra Modi Norway Visit 2026: भारतावर विश्वास का ठेवावा? नॉर्वेच्या महिला पत्रकाराचा प्रश्न, परराष्ट्र मंत्रालयाने तिथेच लोकशाहीचा धडा शिकवला, 'ओस्लो'तील पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?
भारतावर विश्वास का ठेवावा? नॉर्वेच्या महिला पत्रकाराचा प्रश्न, परराष्ट्र मंत्रालयाने तिथेच लोकशाहीचा धडा शिकवला, 'ओस्लो'तील पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?
Petrol Diesel price Hike: पेट्रोल-डिझेलच्या भावात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
पेट्रोल-डिझेलच्या भावात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Sunetra Pawar EV Car: पंतप्रधान मोदींकडून डिझेल बचतीचं आवाहन, सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय, चमचमत्या सोनेरी रंगाची नवी ईव्ही कार पाहिलीत का?
पंतप्रधान मोदींकडून डिझेल बचतीचं आवाहन, सुनेत्रा पवार ईव्ही कार वापरणार, चमचमत्या सोनेरी रंगाची नवी कार पाहिलीत का?
Embed widget