एक्स्प्लोर
Advertisement
अर्जेन्टीनाचा स्टार फुटबॉलर लियोनेल मेसीने सहाव्यांदा पटकावला 'बॅलन डी'ओर पुरस्कार
अर्जेंटिनाच्या लायनेल मेसीनं जागतिक फुटबॉलमध्ये सर्वात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बॅलन डी'ओर पुरस्कारावर सहाव्यांदा आपलं नाव कोरलं आहे.
मुंबई : जागतिक फुटबॉलमध्ये सर्वात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बॅलन डी'ओर पुरस्कारावर अर्जेंटिनाच्या लायनेल मेसीनं पुन्हा आपलं नाव कोरलं आहे. हा पुरस्कार जिंकण्याची मेसीची ही विक्रमी सहावी वेळ आहे. त्यानं तब्बल तीन वर्षांच्या कालावधीनंतर या पुरस्काराचा मान मिळवला. फिफा आणि फ्रान्स फुटबॉलच्या वतीनं हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी यंदा मेसीसह ख्रिस्तियानो रोनाल्डो, वर्जिल वॅन डिच आणि साडिओ मेन हे तिघंही शर्यतीत होते. त्या शर्यतीत मेसीनं आपल्या कामगिरीच्या जोरावर त्या तिघांनाही पिछाडीवर टाकलं. मेसीला यावर्षी सप्टेंबरमध्येही फीफाच्या सर्वश्रेष्ठ खेळाडू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तो मागील सीझनच्या चॅम्पियन लीगमध्ये 12 गोल डागत टॉप स्कोअरर होता.
अर्जेन्टीनाचा दिग्गज फुटबॉलर लियोनेल मेसीने सहाव्यांदा बॅलन डी'ओर पुरस्कार पटकावला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2015 नंतर मेसीचा हा पहिला बॅलन डी'ओर पुरस्कार आहे. गेल्या बारा महिन्यांत मेसी त्याच्या कारकीर्दीतल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्यानं गेल्या मोसमात ३६ गोल झळकावून, बार्सिलोनाला स्पॅनिश ला लीगा जिंकून दिली. यंदा चॅम्पियन्स लीगमधला तो सर्वोत्तम स्कोररही ठरला. यंदाच्या मोसमातही त्याच्या कामगिरीत सातत्य दिसून येत आहे. त्यानं 44 सामन्यांत 41 गोलची नोंद केली आहे. दरम्यान, 32 वर्षीय मेसीने 2009 ते 2012 मध्ये लागोपाठ चार वेळा या पुरस्कार पटकावला होता. यंदा या पुरस्कारासाठी मेसीसह लिव्हरपूल चा डिफेंडर वर्जिल वॅन डिच दुसऱ्या स्थानावर आणि जुवेंट्सचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो वोटिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. रोनाल्डोने आतापर्यंत सहा वेळा बॅलन डी'ओर पुरस्कार आपल्या नावे केला आहे.The Only. One. Ever.
Six-time Ballon d'Or winner, Leo #Messi pic.twitter.com/5PMoJGRCrY — FC Barcelona (@FCBarcelona) December 2, 2019
मेसीने मागील वर्षाचा विजेता लूक मोडरिचकडून पुरस्कार स्विकारला. त्यावेळी तो म्हणाला, 'मी दहा वर्षांआधी पहिल्यांदा हा पुरस्कार पटकावला होता. त्यावेळी मी 22 वर्षांचा होतो आणि आपल्या तिन्ही भावांसोबत येथे आलो होतो. माझ्यासाठी हे एका सुंदर स्वप्नाप्रमाणे होतं. पुढे बोलताना मेसी म्हणाला की, सर्वकाही ठिक असेल तर मला असं वाटतं की, मी आणखी काही वर्ष खेळू शकतो. वेळ फार वेगाने पुढे जात आहे आणि सर्वकाही अचानक होत आहे.' इग्लंडचा माजी फुटबॉलर डेव्हिड बेकहॅम आणि गॅरी लिनेकर सहाव्यांदा हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणाऱ्या मेसीला शुभेच्छा दिल्या.Messi wins his 6th Ballon d’Or. His numbers this year are once again truly extraordinary. He’s head and shoulders the best player in world football. He plays a game that is both joyous and incomprehensible to mere mortals. The award is totally meritorious. ????????????????
— Gary Lineker (@GaryLineker) December 2, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement