Fifa World Cup 2022 : रोनाल्डोच्या पोर्तुगालची विजयाने सुरुवात, सलामीच्या सामन्यात घानाचा 3-2 ने पराभव
FIFA WC 2022 Qatar : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेत पोर्तुगालने विजयाने आपल्या प्रवासाची सुरुवात केली आहे.
![Fifa World Cup 2022 : रोनाल्डोच्या पोर्तुगालची विजयाने सुरुवात, सलामीच्या सामन्यात घानाचा 3-2 ने पराभव FIFA World Cup 2022 Cristiano Ronaldos Portugal won match 3-2 against Ghana Ahmed Stadium Fifa World Cup 2022 : रोनाल्डोच्या पोर्तुगालची विजयाने सुरुवात, सलामीच्या सामन्यात घानाचा 3-2 ने पराभव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/24/b01206faa295d236dd694f882f17e9a91669279874022300_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Fifa World Cup 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेत (Fifa World Cup) आज एक अतिशय अटीतटीचा सामना पाहायला मिळाला, विशेष म्हणजे स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano ronaldo) पोर्तुगाल संघाने (Portugal) संघाने घानाला 3-2 ने मात दिली आहे. या विजयासह रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने फिफा विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली आहे.
View this post on Instagram
फिफा क्रमवारीत पोर्तुगाल नवव्या क्रमांकावर असून घानाचा संघ तब्बल 61 व्या स्थानी आहे. पण असं असतानाही घाना संघाने एक कडवी झुंज दिली. विशेष म्हणजे सामना हाल्फ टाईमपर्यंत अगदी सामान्य दिसून येत होता. दोन्ही संघाना एकही गोल करता आला नव्हता. पण दुसऱ्या हाल्फमध्ये तब्बल 5 गोल झाले, ज्यातील पोर्तुगालने 3 तर घानाने दोन गोल केले. सर्वात आधी 65 व्या मिनिटाला पोर्तुगालला पेनल्टी मिळाली जी कॅप्टन रोनाल्डोने घेत गोल केला आणि संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच 73 व्या मिनिटाला घानाने उत्कृष्ट खेळ दाखवला आणि त्यांचा कर्णधार A Ayew याने गोल करत सामन्यात बरोबरी साधली.
मग युवा स्टार खेळाडू फेलिक्सने ब्रुनो फर्नांडिसच्या जबरदस्त असिस्टवर 78 व्या मिनिटाला गोल करत पोर्तुगालची आघाडी वाढवली. ज्यानंतर काही मिनिटांतच म्हणजेच 80 व्या मिनिटाला पुन्हा ब्रुनोने दिलेल्या असिस्टवर लिओने गोल करत पोर्तुगालची आघाडी 3-1 अशी केली. ज्यानंतर पोर्तुगाल सहज जिंकेल असे वाचक होते. पण बुकारी याने 89 व्या मिनिटाला घानासाठी गोल करत सामना अजून बाकी आहे हे दाखवून दिले, मग अधिकची 9 मिनिटं देण्यात आली, ज्यात दोन्ही संघानी आक्रमणं केली. पण अखेर एकही गोल झाला नाही आणि 3-2 ने पोर्तुगालने सामना जिंकला. विशेष म्हणजे आजच्या गोलच्या मदतीनं पाच वेगवेगळ्या विश्वचषकात गोल करण्याचा रेकॉर्ड रोनाल्डोने केला आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)