एक्स्प्लोर
नायजेरियाचा 2-0 ने विजय, ड गटातील दुसऱ्या स्थानासाठी तिहेरी चुरस
नायजेरियाच्या या विजयात अहमद मुसाने प्रमुख भूमिका बजावली. त्याने 49 व्या आणि 75 व्या मिनिटाला गोल डागून नायजेरियाला सनसनाटी विजय मिळवून दिला.

मॉस्को : नायजेरियाने आईसलँडचा 2-0 असा पराभव करून, विश्वचषकाच्या ड गटात नवी चुरस निर्माण केली. नायजेरियाच्या या विजयात अहमद मुसाने प्रमुख भूमिका बजावली. त्याने 49 व्या आणि 75 व्या मिनिटाला गोल डागून नायजेरियाला सनसनाटी विजय मिळवून दिला. नायजेरियाला पहिल्या सामन्यात क्रोएशियाकडून 2-0 अशा पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्याच नायजेरियाने आईसलँडला हरवल्यामुळे, ड गटातल्या दुसऱ्या स्थानासाठी तिहेरी चुरस निर्माण झाली आहे. या गटातून क्रोएशियाने बाद फेरीचं एक तिकीट बुक केलं आहे. आता दुसऱ्या तिकिटासाठी नायजेरिया, आईसलँड आणि अर्जेंटिना संघात चुरस राहिल. क्रोएशियाचा अर्जेंटिनावर विजय फिफा विश्वचषकात क्रोएशियाने लायनेल मेसीच्या अर्जेंटिनाला जबरदस्त धक्का दिला. क्रोएशियाने अर्जेंटिनाचा 3-0 असा धुव्वा उडवला. या विजयासह क्रोएशियाने विश्वचषकाच्या बाद फेरीत धडक मारली. क्रोएशियाने सलामीच्या सामन्यात नायजेरियाचा 2-0 असा पराभव केला होता. या सामन्यात क्रोएशियाने बलाढ्य अर्जेंटिनाला चांगली टक्कर दिली. अर्जेंटिनाची सगळी भिस्त मेसीवर होती. मेसी फॉर्मात परतेल आणि संघाला विजय मिळवून देईल, अशी आशा अर्जेंटिनाच्या चाहत्यांना होती. उलट क्रोएशियानेच सर्वोत्तम खेळ करत अर्जेंटिनाच्या स्वप्नांवर पाणी फेरले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























