एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर पुणे सुपरजायंट्सच्या ताफ्यात
मुंबई : वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर पुणे सुपरजायंट्सच्या गोटात सामील झाला आहे. आयपीएल 10 मध्ये स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करत असलेल्या रायझिंग पुणे सुपरजायंट्समध्ये शार्दुलची वर्णी लागली आहे.
शार्दूल ठाकूरला किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून पुणे सुपरजायंट्सनी विकत घेतलं. किंग्स इलेव्हन पंजाबनं 2014 सालच्या लिलावात शार्दूल ठाकूरवर यशस्वी बोली लावली होती. पण यंदा दहाव्या आयपीएल मोसमाच्या निमित्तानं रायझिंग पुणे सुपरजायंट्सनं किंग्स इलेव्हन पंजाबशी थेट व्यवहार करुन त्यांच्या ताफ्यातल्या शार्दूल ठाकूरला विकत घेतलं आहे.
पुणे सुपरजायंट्सचा हा दुसरा व्यवहार असून, याआधी पुण्यानं दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून मयांक अगरवालला विकत घेतलं आहे. पुणे सुपरजायंट्स संघाच्या कर्णधारपदावरुन नुकतीच महेंद्रसिंग धोनीची उचलबांगडी करण्यात आली होती.
आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं यंदा 5 एप्रिल ते 21 मे या कालावधीत आयोजन करण्यात आलं आहे. पहिला सामना 5 एप्रिलला सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येईल, तर टूर्नामेंटचा अंतिम सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये 21 मे रोजी खेळवण्यात येईल.
प्रत्येक संघ 14 सामने खेळणार
- ही स्पर्धा 47 दिवस चालणार असून 10 वेगवेगळ्या स्टेडियम्सवर सामने खेळवण्यात येतील. - प्रत्येक संघ 14 सामने खेळणार आहे. यापैकी सात सामने संघाच्या होम ग्राऊंडवर होतील. - 2011 नंतर पहिल्यांदाच इंदूरमध्ये आयपीएल सामने होणार आहेत.क्वालिफायर-एलिमिनेटरची मैदानं निश्चित नाही
- या मोसमाचा पहिला क्वालिफायर सामना 16 मे रोजी खेळवला जाईल. - तर एलिमिनेटर राऊंड 17 मे रोजी होईल. यानंतर दुसरा क्वालिफायर 19 मे रोजी खेळवण्यात येणार आहे. - पण क्वालिफायर आणि एलिमिनेटरची मैदानांची अद्याप घोषणा झालेली नाही.आईपीएल-10 चं टाईमटेबल
# 5 एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर (हैदराबाद, रात्री 8 वाजता) # 6 एप्रिल - रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. मुंबई इंडियन्स (पुणे, रात्री 8 वाजता) # 7 एप्रिल - गुजरात लायन्स वि. कोलकाता नाईटरायडर्स (राजकोट, रात्री 8 वाजता) # 8 एप्रिल - किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (इंदूर, दुपारी 4 वाजता) # 8 एप्रिल - रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (बंगळुरु, रात्री 8 वाजता) # 9 एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद वि. गुजरात लायन्स (हैदराबाद, दुपारी 4 वाजता) # 9 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईटरायडर्स (मुंबई, रात्री 8 वाजता) # 10 एप्रिल - किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर (इंदूर, रात्री 8 वाजता) # 11 एप्रिल - रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (पुणे, रात्री 8 वाजता) # 12 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद (मुंबई, रात्री 8 वाजता) # 13 एप्रिल - कोलकाता नाईटरायडर्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (कोलकाता, रात्री 8 वाजता) # 14 एप्रिल - रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर वि. मुंबई इंडियन्स (बंगळुरु, दुपारी 4 वाजता) # 14 एप्रिल - गुजरात लायन्स वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (राजकोट, रात्री 8 वाजता) # 15 एप्रिल - कोलकाता नाईटरायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद (कोलकाता, दुपारी 4 वाजता) # 15 एप्रिल - दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (दिल्ली, रात्री 8 वाजता) # 16 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. गुजरात लायन्स (मुंबई, दुपारी 4 वाजता) # 16 एप्रिल - रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (बंगळुरु, रात्री 8 वाजता) # 17 एप्रिल - दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. कोलकाता नाईटरायडर्स (दिल्ली, दुपारी 4 वाजता) # 17 एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (हैदराबाद, रात्री 8 वाजता) # 18 एप्रिल - गुजरात लायन्स वि. रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर (राजकोट, रात्री 8 वाजता) # 18 एप्रिल - सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (हैदराबाद, रात्री 8 वाजता) # 20 एप्रिल - किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स (इंदूर, रात्री 8 वाजता) # 21 एप्रिल - कोलकाता नाईटरायडर्स वि. गुजरात लायन्स (कोलकाता, रात्री 8 वाजता) # 22 एप्रिल - दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. मुंबई इंडियन्स (दिल्ली, दुपारी 4 वाजता) # 22 एप्रिल - रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद (पुणे, रात्री 8 वाजता) # 23 एप्रिल - गुजरात लायन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (राजकोट, दुपारी 4 वाजता)अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा
क्राईम
Advertisement