एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पोर्तुगाल युरो कपच्या अंतिम फेरीत, वेल्सवर मात
लंडन : पोर्तुगालच्या फुटबॉल संघाने युरो कप 2016 स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पोर्तुगालने पहिल्या सेमीफायनलमध्ये वेल्स 2-0 ने पराभूत करुन अंतिम फेरीत स्थान मिळवलं.
पोर्तुगालतर्फे ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नानी यांनी प्रत्येकी एक गोल केला. स्टार फुटबॉलर रोनाल्डोने सामन्याच्या 50व्या मिनिटाला गोल करुन पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली. त्यानतंर अवघ्या 3 मिनिटांनी म्हणजेच 53व्या मिनिटाला नानीने वेल्सच्या गोलकीपरला चकवा देत शानदार गोल केला.
जर्मनी की फ्रान्स... युरोच्या अंतिम सामन्यात कोण मारणार धडक?
पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघाला गोल करता आला नाही. उलट पहिल्या हाफमध्ये वेल्सच्या संघांच वर्चस्व दिसूत होतं. दोन्ही संघांना गोलचे अनेक संधी मिळाल्या, पण कोणालाही यश आलं नाही. अखेर दुसऱ्या हाफमध्ये रोनाल्डोने पोर्तुगालचं खातं उघडून आघाडी मिळवली. त्यानंतर नानीने दुसरा गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केलं.VIDEO: सुरक्षा भेदली, मैदानात घुसला, रोनाल्डोही सेल्फीसाठी तयार झाला, पण...
दरम्यान, या स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना 8 जुलै रोजी जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात खेळवला जाणार आहे. यानंतर विजयी संघ 11 जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात पुर्तगालशी भिडेल.????⚽️ #RapidReplay by @AudibleSports #Ronaldo. Header 1-0 #Portugal #UEFA #Euro2016 Soccer: Portugal vs. Wales pic.twitter.com/bTG0fCvx6y
— Audible Sports (@AudibleSports) July 6, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement