एक्स्प्लोर

Euro 2020 Semifinal : इटलीला फायनलचं तिकीट; पेनल्टी शूटआउटमध्ये स्पेनला नमवून अंतिम सामन्यात धडक

Euro 2020 Semifinal : पेनल्टी शूटआउटमध्ये स्पेनला नमवून इटलीची युरो चषकाच्या अंतिम सामन्यात धडकअंतिम फेरीत इटलीसमोर आता इंग्लंड आणि डेन्मार्क सामन्यातल्या विजेत्या संघाचं आव्हान

Euro 2020 Semifinal : युरो चषकातील पहिल्या उपांत्य सामन्यात इटलीनं स्पेनचा पेनल्टी शूटआऊटवर पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. युरो चषकाची फायनल गाठण्याची इटलीची ही आजवरची चौथी वेळ ठरली. चुरशीच्या झालेल्या या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एकेका गोलची नोंद केली. इटलीकडून चिएसानं 60व्या मिनिटाला गोल डागला. तर स्पेनच्या मोरोटानं 80व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली. त्यानंतर अतिरिक्त वेळेत सामना बरोबरीत सुटल्यानं या स्पर्धेत तिसऱ्यांदा पेनल्टी शूटआऊटवर निकाल देण्याची वेळ आली. ज्यात इटलीनं 4-2 अशी बाजी मारली. दरम्यान अंतिम फेरीत इटलीसमोर आता इंग्लंड आणि डेन्मार्क सामन्यातल्या विजेत्या संघाचं आव्हान असणार आहे.

पहिल्या सत्रात दोन्ही संघांच्या पदरी निराशाच आली. अटीतटीच्या सामन्यात पहिल्या सत्रात दोघांपैकी कोणत्याही संघाला गोल डागता आला नाही. मात्र दुसऱ्या सत्रात इटलीचा संघ काहीशी आक्रमक खेळी करताना दिसला. इटलीनं 60व्या मिनिटाला गोल डागत 1-0 अशी आघाडी घेतली. इटलीच्या फेडरिको चिसानं संघाला ही आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्पेनचा संघ काहीसा दडपणाखाली आला. अशातच स्पेनच्या अलवारो मोराटाने 80व्या मिनिटाला गोल करून सामना बरोबरीला आणला. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल डागल्यामुळे सामना बरोबरीला आला होता. उर्वरित वेळेत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. दोन्ही संघांकडून सामन्यात आघाडी घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र सामना बरोबरीत सुटल्यानं या स्पर्धेत तिसऱ्यांदा पेनल्टी शूटआऊटचा थरार रंगला. 

घातक आणि विजयासाठी आक्रमक झालेला इटलीचा संघ स्पेनसाठी बऱ्याचदा डोकेदुखी ठरला आहे. या सामन्यातही असंच काहीसं पाहायला मिळालं. पेनल्टी शूटआउटमध्ये इटलीनं  4-2 अशी बाजी मारली. परिणामी स्पेनला पराभवाचा सामना करावा लागला. स्पेनच्या पराभवासोबतच इटलीनं युरो चषकातील अंतिम सामन्याचं तिकीट निश्चित केलं. 

साखळी फेरीत इटलीने टर्की, स्वित्झर्लंड आणि वेल्सला पराभूत करत बाद फेरीत धडक मारली होती. त्यानंतर बाद फेरीत ऑस्ट्रियाचा 2-1 ने पराभव केला होता. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमचा 2-1 ने धुव्वा उडवला. आता उपांत्य फेरीत स्पेनला पराभूत करत इटलीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत इटलीसमोर आता इंग्लंड आणि डेन्मार्क सामन्यातल्या विजेत्या संघाचं आव्हान असणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Embed widget