एक्स्प्लोर
Advertisement
शेवटच्या सामन्यात अॅलिस्टर कूकचा विक्रमांचा डोंगर
कसोटी कारकीर्दीतील शेवटच्या सामन्यात अॅलिस्टर कूकने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. पदार्पणात कसोटी शतक ठोकणाऱ्या कूकने शेवटच्या सामन्यातही शतक ठोकलं.
लंडन : इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज अॅलिस्टर कूकने ओव्हल कसोटीत दमदार शतक साजरं केलं. कूकच्या कसोटी कारकीर्दीतलं हे 33 वं शतक ठरलं. त्याने पदार्पणाच्या कसोटीतही शतक ठोकलं होतं आणि कारकीर्दीतील अखेरच्या कसोटीतही शतक ठोकलं.
ओव्हल कसोटी ही कूकच्या कारकीर्दीतली अखेरची कसोटी आहे. अखेरच्या कसोटीत शतक झळकावणारा कूक हा जगातला चाळीसावा फलंदाज आहे. तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणात आणि अखेरच्या सामन्यात शतक ठोकणारा जगातला केवळ पाचवा फलंदाज ठरला आहे.
कूकने मार्च 2006 साली भारताविरुद्ध नागपूर कसोटीत पदार्पण केलं होतं. पदार्पणाच्या त्या कसोटीतही कूकने शतकी खेळी साकारली होती. विशेष म्हणजे कूकचा अंतिम सामनाही भारताविरुद्धच होत आहे.
पदार्पणाच्या आणि अखेरच्या कसोटीत शतक ठोकणारे फलंदाज
रेजिनाल्ड डफ (ऑस्ट्रेलिया)
विल्यम पॉन्सफोल्ड (ऑस्ट्रेलिया)
ग्रेग चॅपेल (ऑस्ट्रेलिया)
मोहम्मद अझरुद्दीन (भारत)
अॅलिस्टर कूक (इंग्लंड)
अखेरच्या कसोटीत कूकचे विक्रम
अखेरची कसोटी कूकसाठी अविस्मरणीय ठरणार आहे. पदार्पणाच्या आणि अखेरच्या कसोटीतील दोन्ही डावात 50 पेक्षा जास्त धावा करणारा तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील जगातील दुसरा फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ब्रुस मिचेल यांच्या नावावर होता.
सलामीवीर फलंदाज म्हणून सर्वाधिक कसोटी शतकं करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कूकचा समावेश झाला आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्या नावावर 203 डावांमध्ये सर्वाधिक 33 शतकं आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर आता कूक आहे. त्याने 278 डावांमध्ये 31 शतकं केली आहेत. यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन तिसऱ्या (30 शतकं, 184 डाव) आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ (27 शतकं, 196 डाव) चौथ्या क्रमांकावर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement