एक्स्प्लोर
सिंधूची दुबई सुपर सीरीज फायनल्सच्या अंतिम फेरीत धडक
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूचा मुकाबला जपानच्या अकाने यामागुचीशी होईल.
दुबई : भारताच्या ऑलिम्पिक आणि जागतिक रौप्यविजेत्या पी. व्ही. सिंधूने चीनच्या चेन युफेचा 21-15, 21-18 असा धुव्वा उडवून दुबई सुपर सीरीज फायनल्सच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूचा मुकाबला जपानच्या अकाने यामागुचीशी होईल. सिंधून 2016 साली रिओ ऑलिम्पिकची, तर 2017 साली ग्लास्गो जागतिक विजेतेपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
त्यानंतर सिंधूने दुबई सुपर सीरीज फायनल्सच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवून आपल्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला. सिंधूने यंदाच्या मोसमात इंडिया ओपन आणि कोरिया ओपन या सुपर सीरीजची विजेतीपदं पटकावली.
जागतिक विजेतेपद आणि हाँगकाँग ओपनमध्ये तिला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement