एक्स्प्लोर
मुरलीधरनवर श्रीलंका क्रिकेट बोर्ड नाराज
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 26 Jul 2016 07:02 PM (IST)
1/7

श्रीलंकेचा ऑफ स्पिनर मुथैय्या मुरलीधरने क्रिकेट जगतातील अनेक विक्रम मोडले आहेत. पण त्याच्या वर्तणुकीने श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडे त्याच्या विरोधात तक्रार केली आहे.
2/7

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना कधीही प्रशिक्षकाची संधी दिली नाही. त्यांनी बाहेरून परदेशी प्रशिक्षक आणण्यात धन्यता मानल्याचा आरोपही मुरलीधरनने केला आहे.
3/7

दरम्यान, मुरलीधरन विरोधात तक्रार मिळाल्याचे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. पण आता दोन्ही संघांनी चर्चा करून या वादावर पडदा टाकला आहे.
4/7

मुरलीधरनने मनमानी करत जबरदस्तीने ऑस्ट्रेलियन संघासोबत पालेकेले स्टेडीअममध्ये प्रवेश केल्याचा आरोप सुमीतपाल यांनी केला आहे. दरम्यान, मुरलीधरनने हे सर्व आरोप धुडकावून लावत श्रीलंका क्रिकेट बोर्ड आपल्या चुका लपवण्यासाठी असे अरोप करत असल्याचा पलटवार केला आहे. तसेच आपण जितके श्रीलंका क्रिकेट संघासाठी केल्या त्याच्या 10%ही परतावा श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिला नसल्याचे म्हटले आहे.
5/7

श्रीलंकेने दोन वर्षापूर्वी आयसीसीची टी२० ट्रॉफी जिंकली होती. मात्र, सध्या श्रीलंका संघाची कामगिरी समाधानकारक नसल्याने मुरलीधरन आणि कुमार संगाकारासारख्या दिग्गज क्रिकेटपटूंची उणीव भासत आहे.
6/7

मुरलीधरन श्रीलंका-ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या आगामी कसोटी क्रिकेटच्या मालिकेतील आस्ट्रेलियासाठी पाहुणा प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. श्रीलंकेकडून खेळताना त्याच्या विक्रमामुळे त्याला श्रीलंकन क्रिकेटमधील 'हिरो' म्हणले जात होते. पण त्याच्या मनमानी कारभारमुळे सध्या श्रीलंका क्रिकेट बोर्ड कमालीचा नाराज आहे.
7/7

सोमवारी श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तिलम्बा सुमीतपाल यांनी टीम मॅनेजर चरिथ सेनानायके यांच्याशी गैरवर्तणुकीचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे ज्या ऑस्ट्रेलिया संघाने मुरलीधरनला श्रीलंकेच्या संघातून बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले, त्याच संघाच्या बाजूने मुरलीधरन बोलत असल्याचा आरोप केला आहे.
Published at : 26 Jul 2016 07:02 PM (IST)
Sponsored Links by Taboola
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
चौकार गेला समजून गप्पा मारत बसले, अन् पुढच्याच क्षणी तिलक वर्मा नको ते घडलं; गौतम गंभीरही संतापला, पाहा VIDEO
क्रीडा
IND vs WI Live : अभिषेक शर्माचा धडाका! भारताने वेस्ट इंडिजसमोर ठेवलं 224 धावांचं आव्हान, जाणून घ्या LIVE अपडेट
क्रीडा
ऋतुराज, रजत, देवदत्त सगळे स्टार नापास; तरीही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला गुंडाळलं, कोण ठरला हिरो?
क्रीडा
रणजी ट्रॉफीत पहिल्याच दिवशी हायव्होल्टेज ड्रामा! खेळण्यासाठी टीम मैदानाकडे फिरकलीच नाही, नेमकं काय घडलं? चक्रावून टाकणारे माहिती समोर





















