एक्स्प्लोर
परेराने डीआरएस घेताना ड्रेसिंग रुमकडे पाहिलं?
परेराने ड्रेसिंग रुमकडे पाहिल्यानंतरच डीआरएस घेतला, असं बोललं जात आहे.
कोलकाता : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेचा फलंदाज दिलरुवान परेराने घेतलेला डीआरएस संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. परेराने ड्रेसिंग रुमकडे पाहिल्यानंतरच डीआरएस घेतला, असं बोललं जात आहे.
श्रीलंकेची 7 बाद 208 धावा अशी परिस्थिती असताना 57 व्या षटकात हा प्रकार घडला. सात चेंडू खेळल्यानंतरही परेराने खातंही उघडलं नव्हतं. त्यातच मोहम्मद शमीच्या चेंडूवर पंचांनी त्याला पायचीत बाद दिलं.
बाद दिल्यानंतर लगेच परेरा ड्रेसिंग रुमकडे वळला, ड्रेसिंग रुममधील सहकाऱ्यांकडे पाहिलं आणि माघारी वळून डीआरएसची मागणी केली. परेरा बाद झाला नव्हता, असं त्या डीआरएसनंतर समजलं. समालोचकांनीही परेराच्या या वागण्यावर भाष्य केलं.
https://twitter.com/yogeshsatya4545/status/932110039812399104
ट्विटरवरही परेराच्या डीआरएसवरुन चर्चा रंगली. त्याने आयसीसीच्या नियमाचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात येत आहे. डीआरएस घेताना ड्रेसिंग रुमकडे पाहून कोणतेही हावभाव करता येत नाही, असा आयसीसीचा नियम आहे.
आयसीसीच्या 'स्टँडर्ड टेस्ट मॅच प्लेइंग कंडीशन्स फॉर 2016-17' नुसार, क्षेत्ररक्षण करणारा कर्णधार किंवा फलंदाजाने डीआरएस घेताना बाहेरुन मदत घेतल्याचं पंचांच्या लक्षात आलं तर डीआरएस रद्द करण्याचा अधिकार पंचांना आहे.
यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही असाच प्रसंग घडला होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने डीआरएस घेताना ड्रेसिंग रुमचा सल्ला घेतला होता. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने ही बाब लगेच लक्षात आणून दिली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement