एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धोनीच्या अनुभवामुळे भारत 2019चा विश्वचषक जिंकू शकतो : सेहवाग
'जेव्हा युवा खेळाडू धोनीच्या मार्गदर्शनाखाली खेळतील तेव्हाच 2019चा विश्वचषक भारत जिंकू शकेल. धोनीचं नेतृत्त्व आणि रणनीति यामुळेच भारताने 2011 साली विश्वचषकावर नाव कोरलं होतं.'
मुंबई : विश्वचषक 2019 इंग्लंडमध्ये होणार असून त्यासाठी सर्वच संघांनी आतापासून कंबर कसली आहे. द. आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका आणि श्रीलंकेतील टी-20 तिरंगी मालिकेत भारताने चमकदार कामगिरी केली आहे. याच मालिकेत दिनेश कार्तिकनेही शानदार कामगिरी केली. त्यामुळे आता धोनीऐवजी कार्तिकला खेळवण्यात यावं अशी मागणी केली जाऊ लागली आहे.
दिनेश कार्तिकच्या तुफानी खेळीनंतर आता काही जण अशीही मागणी करत आहेत की, वनडे संघात धोनीच्या जागी कार्तिकला संधी देण्यात यावी. पण भारतीय संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या मते, विश्वचषक 2019 मध्ये धोनीची उपस्थिती ही युवकांना मार्गदर्शक ठरेल.
'जेव्हा युवा खेळाडू धोनीच्या मार्गदर्शनाखाली खेळतील तेव्हाच 2019चा विश्वचषक भारत जिंकू शकेल. धोनीचं नेतृत्त्व आणि रणनीति यामुळेच भारताने 2011 साली विश्वचषकावर नाव कोरलं होतं.' असं सेहवाग एका कार्यक्रमात म्हणाला.
एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सेहवाग म्हणाला की, 'एक युवा खेळाडू म्हणून मी माझा पहिला विश्वचषक दौरा सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांच्यासोबत 2003 साली खेळलो होतो. त्यावेळी हे सर्व सीनियर खेळाडू माझी मदत करत होते.'
'सध्या भारतीय संघात अनेक युवा खेळाडू आहेत. पण त्यांच्याकडे धोनीसारखा वरिष्ठ खेळाडू आहे. धोनी त्यांना योग्य मार्गदर्शन करु शकतो. तसंच 2019च्या विश्वचषकासाठी त्यांना तयारही करु शकतो.' असं म्हणत सेहवागने धोनीची पाठराखण केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
आयपीएल
Advertisement