एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बीसीसीआय धोनीऐवजी आता पंतला आजमवणार, रोहित शर्माचं कसोटीत पुनरागमन
दोन्ही टी-20 मालिकांसाठीच्या भारतीय संघात यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंतची निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेतही धोनीचा समावेश करण्यात आलेला नाही. तर कसोटी संघात रोहित शर्माचं पुनरागमन झालं आहे.
मुंबई : भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघातून अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला वगळण्यात आलं आहे. विंडीजविरुद्धच्या टी20 संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे देण्यात आलं आहे, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे सोपवण्यात आलं आहे.
टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी धोनीचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही.
या दोन्ही मालिकांसाठीच्या भारतीय संघात यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंतची निवड करण्यात आली आहे. दोन्ही संघांत दिनेश कार्तिक पर्यायी यष्टिरक्षक असेल.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये 4 नोव्हेंबरपासून टी20 मालिका खेळवली जाणार आहे. 4 नोव्हेंबर (कोलकाता), 6 नोव्हेंबर (लखनौ), 11 नोव्हेंबर (चेन्नई) ला दोन संघांमध्ये सामने होतील.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 21 नोव्हेंबरपासून टी20 सामने होतील. 21, 23 आणि 25 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियात हे सामने रंगणार आहेत.
झारखंडचा 29 वर्षीय डावखुरा स्पिनर शाहबाज नदीमचा संघात समावेश करण्यात आला आहे. कृणाल पांड्याने संघात आपलं स्थान टिकवलं आहे, तर दुखापतीमुळे संघातून बाहेर राहिलेल्या वॉशिंग्टनने पुनरागमन केलं आहे.
दरम्यान, विंडीजविरुद्ध होणाऱ्या चौथ्या आणि पाचव्या वन डे सामन्यासाठी केदार जाधवचा भारतीय वन डे संघात समावेश करण्यात आला आहे.
विंडीजविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टिरक्षक), कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, शाहबाज नदीम
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, रिषभ पंत (यष्टिरक्षक), कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, खलील अहमदTeam for three T20I match series against Windies announced
Rohit Sharma (C), Shikhar, KL Rahul, DK, Manish, Shreyas Iyer, Rishabh Pant (wk), Krunal Pandya, Washington Sundar, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Bhuvneshwar Kumar, Bumrah, Khaleel Ahmed, Umesh Yadav, Shahbaz Nadeem — BCCI (@BCCI) October 26, 2018
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठीही भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माने कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. शिवाय शिखर धवनच्या जागी पुन्हा एकदा मुंबईकर खेळाडू पृथ्वी शॉचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी समावेश करण्यात आला आहे. काऊंटी क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर मुरली विजयनेही कसोटी संघात पुनरागमन केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमारTeam for three T20I match series against Australia announced.
Virat Kohli (C), Rohit (vc), Shikhar, KL Rahul, Shreyas Iyer, Manish, DK, Rishabh Pant (wk), Kuldeep Yadav, Yuzvendra Chahal, Washington Sundar, Krunal Pandya, Bhuvneshwar Kumar, Jasprit Bumrah, Umesh Yadav, Khaleel — BCCI (@BCCI) October 26, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement