एक्स्प्लोर

CWG2018: सव्वा तासात 3 विजय, महाराष्ट्राचा राहुल आवारे अंतिम फेरीत!

दरम्यान, राहुलचा अंतिम सामना आज दुपारी 12 वाजता कॅनडाचा पैलवान स्टीफन तकाहाशीसोबत होणार आहे.

मेलबर्न : महाराष्ट्रातील बीडचा गुणी पैलवान राहुल आवारे रिओ ऑलिम्पिकमध्ये जाण्याची संधी मिळाली नसली तरी ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याची दमदार कामगिरी सुरु आहे. राहुल आवारेने पुरुषांच्या 57 किलो फ्री स्टाईल कुस्ती प्रकाराच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. राहुलने अवघ्या सव्वा तासात कुस्तीचे तीन सामने जिंकून फायनल गाठली. सेमीफायनलमध्ये राहुल आवारेने भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी देश असलेल्या पाकिस्तानच्या मोहम्मद बिलालला धोबीपछाड दिला. अतिशय अटीतटीच्या सामन्यात राहुल आवारेने कडवी झुंज देत 12-8 असा विजय मिळवला. या विजयानंतर फायनलमध्ये धडक देत त्याने भारतासाठी रौप्यपदक निश्चित केलं आहे. CWG2018: सव्वा तासात 3 विजय, महाराष्ट्राचा राहुल आवारे अंतिम फेरीत! राहुलने याआधी त्याच्या दोन सामन्यात तांत्रिक वर्चस्वाच्या जोरावर उपांत्य सामन्यात प्रवेश केला होता. राहुलने पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या जॉर्ज रामवर 4-0 असा विजय मिळवला होता. राहुलच्या तुलनेत जॉर्ज कामगिरी फारच सुमार असल्याने रेफ्रीने राहुल आवारेला विजयी घोषित केलं. तर पुढच्या सामन्यात राहुल आवारेने ऑस्ट्रेलियाच्या थॉमस चिचिहिनीला मात देऊन उपांत्य सामन्यात प्रवेश केला. दरम्यान, राहुलचा अंतिम सामना आज दुपारी 12 वाजता कॅनडाचा पैलवान स्टीफन तकाहाशीसोबत होणार आहे. त्यामुळे आणखी एक सुवर्ण पदक मिळण्याची भारतीयांची अपेक्षा उंचावली आहे. प्रो रेसलिंग लीग : राहुल आवारेने संदीप तोमरला लोळवलं बबिता फोगटचा सलग तिसरा विजय दुसरीकडे महिलांच्या 53 किलो फ्री स्टाईल कुस्तीत भारताच्या बबिता कुमारीने सलग तिसरा विजय मिळवला आहे. बबिताने राऊंड रोबिनमधील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या दीपिका दिलहानीवर 4-0 असा विजय मिळवला. बबिताने एकाच डावात दीपिकाला चीतपट करुन विजय मिळवला. त्याआधी बबिताने पहिल्या सामन्यात नायजेरियाच्या बोस सॅम्युअलला मात दिली. हा सामना तिने 3-1 ने जिंकला. बबितानेही भारतासाठी एक पदक निश्चित केलं आहे. पैलवान राहुल आवारेचा ऑलिम्पिकच्या शर्यतीतून पत्ता कट सुशील कुमार फायनलमध्ये दुसरीकडे भारताचा पैलवान सुशीलकुमारने पुरुषांच्या 74 किलो कुस्ती प्रकाराच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये सुशीलने ऑस्ट्रेलियाच्या कोनोर इवान्सवर 4-0 ने मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. सुशीलने याआधी उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानच्या मोहम्मद बटवर 4-0 अशा विजय मिळवला होता. गेल्या चार स्पर्धांमधील भारताची कामगिरी भारतीय खेळाडूंची गेल्या चार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधली कामगिरी ही लक्षवेधक ठरली होती. त्यामुळे यंदा गोल्ड कोस्टच्या समुद्रमंथनातूनही भारताला पदकांची मोठी अपेक्षा आहे. 2002... मॅन्चेस्टर... 69 पदकं, 2006... मेलबर्न... 50 पदकं, 2010... दिल्ली... 101 पदकं, 2014... ग्लास्गो... 64 पदकांची लयलूट भारताने केली आहे

21 व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी

नेमबाजी (पुरुष डबल ट्रॅप) अंकुर मित्तल कांस्य नेमबाजी (महिला डबल ट्रॅप) श्रेयसी सिंग सुवर्ण नेमबाजी (पुरुष - 50 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवाल कांस्य पॅरा-पॉवरलिफ्टिंग (हेवी वेट) सचिन चौधरी कांस्य नेमबाजी (महिला - 25 मीटर रॅपिड पिस्टल) हीना सिद्धू सुवर्ण बॅडमिंटन (मिश्र) सुवर्ण टेबलटेनिस (पुरुष) सुवर्ण नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) मेहुली घोष रौप्य नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर रायफल) अपूर्वी चंदेला कांस्य नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) जितू राय सुवर्ण नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर पिस्टल) ओम मिथरवाल कांस्य वेटलिफ्टिंग (पुरुष - 105 किलो वजनी गट) प्रदीप सिंग रौप्य टेबल टेनिस (सांघिक) सुवर्ण नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) मनू भाकेर सुवर्ण नेमबाजी (महिला - 10 मीटर्स एअर पिस्टल) हीना सिद्धू रौप्य नेमबाजी (पुरुष - 10 मीटर्स एअर रायफल) रवी कुमार कांस्य वेटलिफ्टिंग (पुरुष - 94 किलो वजनी गट) विकास थालिया कांस्य वेटलिफ्टिंग (महिला - 69 किलो वजनी गट) पूनम यादव (222 किलो वजन) सुवर्ण वेटलिफ्टिंग (पुरुष - 85 किलो वजनी गट) आर वेंकट राहुल (338 किलो वजन) सुवर्ण वेटलिफ्टिंग (पुरुष - 77 किलो वजनी गट) सतीश शिवलिंगम (317 किलो वजन) सुवर्ण वेटलिफ्टिंग (महिला - 53 किलो वजनी गट) संजिता चानू (192 किलो वजन) सुवर्ण वेटलिफ्टिंग (महिला - 48 किलो वजनी गट) मीराबाई चानू (196 किलो वजन) सुवर्ण वेटलिफ्टिंग (पुरुष - 56 किलो वजनी गट) गुरुराजा (249 किलो वजन) रौप्य वेटलिफ्टिंग (पुरुष - 69 किलो वजनी गट) दीपक लाथर (295 किलो वजन) कांस्य संबंधित बातम्या : CWG 2018 : हीना सिद्धूला सुवर्ण, यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये दुसरं पदक CWG 2018: भारतीय हॉकी संघाची सेमी फायनलमध्ये धडक CWG 2018 : महिला-पुरुष नेमबाजीत एकाच दिवशी 4 पदकं CWG 2018 : महिलांच्या सांघिक टेबल टेनिसमध्ये भारताला ‘सुवर्ण’ CWG 2018 : 16 वर्षांच्या मनूला नेमबाजीत सुवर्ण, हीनाला रौप्य CWG 2018 : 69 किलो वजनी गटात पूनम यादवला सुवर्ण CWG 2018 : 317 किलो वजन उचललं, सतीश शिवलिंगमला सुवर्ण CWG 2018 : 18 वर्षांच्या दीपक लाथरला कांस्यपदक CWG 2018 : संजिता चानूने 192 किलो वजन उचललं, भारताला दुसरं सुवर्ण CWG 2018 : भारताला पहिलं गोल्ड, वेटलिफ्टर मीराबाई चानूला सुवर्ण GC2018 : 249 किलो वजन उचललं, गुरुराजाला रौप्यपदक! ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेची नांदी

महत्त्वाच्या बातम्या

KL Rahul Retires Hurt : केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
केएल राहुल अचानक रिटायर्ड हर्ट; शतकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना सोडलं मैदान, सगळेच चक्रावले, नेमकं घडलं तरी काय?
IND vs SL 1st Test DAY-1 Live : KL राहुल रिटायर्ड हर्ट! पडिक्कलने ठोकले शतक, जाणून घ्या भारत आणि श्रीलंका सामन्यातील प्रत्येक LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : KL राहुल रिटायर्ड हर्ट! पडिक्कलने ठोकले शतक, जाणून घ्या भारत आणि श्रीलंका सामन्यातील प्रत्येक LIVE अपडेट्स
Ind vs Sl 1st Test : गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
गॉल कसोटीत काळजाचा ठोका चुकवणारा क्षण! KL राहुलचा 'तो' खतरनाक शॉट अन् श्रीलंकन खेळाडू जखमी, सोडावे लागले मैदान, नेमकं काय घडलं? Video
Ind vs Sl 1st Test : यशस्वी जैस्वालला जाणूनबुजून खाली पाडलं?, श्रीलंकन गोलंदाजाच्या कृत्यावरून मोठा वाद, पहिल्या कसोटीत घडलेल्या 'त्या' घटनेने सगळेच हैराण, VIDEO व्हायरल
यशस्वी जैस्वालला जाणूनबुजून खाली पाडलं?, श्रीलंकन गोलंदाजाच्या कृत्यावरून मोठा वाद, पहिल्या कसोटीत घडलेल्या 'त्या' घटनेने सगळेच हैराण, VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget