CWG 2022: श्रीलंकेनंतर आता पाकिस्तानचेही दोन बॉक्सर बर्मिंगहॅममधून बेपत्ता
कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22व्या हंगामाची 8 ऑगस्टला समारोप झाला. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या पाकिस्तानचे दोन बॉक्सर सुलेमान बलूच (Suleman Baloch) आणि नजीरुल्लाह खान (Nazeer Ullah Khan) बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली.
Birmingham 2022 Commonwealth Games: कॉमनवेल्थ स्पर्धेच्या 22व्या हंगामाची 8 ऑगस्टला समारोप झाला. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या पाकिस्तानचे दोन बॉक्सर सुलेमान बलूच (Suleman Baloch) आणि नजीरुल्लाह खान (Nazeer Ullah Khan) बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. याबाबत राष्ट्रीय महासंघानं ही माहिती दिली. पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशनचे सचिव नासेर तांग यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. या घटनेनंतर क्रिडाविश्वात एकच खळबळ माजली.
नासेर तांग काय म्हणाले?
"सुलेमान बलूच आणि नजीरुल्लाह खान यांचं पासपोर्ट आणि इतर प्रवासाची कागदपत्रे महासंघाच्या अधिकाऱ्यांकडं आहेत. संघ व्यवस्थापनानं यूकेमधील पाकिस्तान उच्चायुक्तांना आणि लंडनमधील संबंधित अधिकाऱ्यांना सुलेमान आणि नझिरुल्ला बेपत्ता झाल्याची माहिती दिली. बेपत्ता झालेल्या बॉक्सरची कागदपत्रे पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी मानक कार्यप्रणालीनुसार ठेवण्यात आली", अशी माहिती तांग यांनी दिली.
चार सदस्यीय सामितीचा स्थापना
पाकिस्तान ऑलिम्पिक संघानं बेपत्ता झालेल्या दोन बॉक्सरचा तपास करण्यासाठी चार सदस्यीय समितीची स्थापना केलीय. याआधी दोन महिन्यापूर्वी राष्ट्रीय जलतरणपटू फैझान अकबर हंगेरीतील फिनावर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बेपत्ता झाला. जूनपासून त्याचा तपास लागला नाही.
कॉमनवेल्थ स्पर्धेत पाकिस्ताननं आठ पदक जिंकली
कॉमनवेल्थ स्पर्धेच्या बॉक्सिंग स्पर्धेत पाकिस्तानला एकही पदक जिंकता आलं नाही. वेटलिफ्टिंग आणि भालाफेकमधील दोन सुवर्णांसह या खेळांमध्ये देशानं आठ पदकं जिंकली.
हे देखील वाचा-