एक्स्प्लोर

IND vs PAK: भारत- पाकिस्तानचा क्रिकेटच्या मैदानात राडा; गंभीर- आफ्रिदीपासून भज्जी-अख्तर पर्यंत, मैदानातील पाच मोठे वाद

Asia Cup 2022: क्रिडाविश्वात भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याला खूप महत्वं दिलं जातं. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन देशांमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये उत्साह आणि रोमांच शिगेला पोहोचलेला असतो.

Asia Cup 2022: क्रिडाविश्वात भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्या सामन्याला खूप महत्वं दिलं जातं. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन देशांमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये उत्साह आणि रोमांच शिगेला पोहोचलेला असतो. त्यामुळं क्रिकेटप्रेमींमध्ये हा सामना सर्वाधिक लोकप्रिय आहे. या लोकप्रियतेमुळंचं दोन्ही देशांदरम्यान, कायम अत्यंत तणावाच्या वातावरणात सामना खेळला जातो. जेव्हा दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतात, त्यावेळी क्रिकेट सामन्याच्या व्यतिरिक्त दोन्ही संघातील खेळाडूतही बऱ्याच वेळा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. यातील काही असेही वाद आहेत, जे अजूनही कोणीच विसरू शकलेलं नाही. 

जावेद मियाँदाद-किरण मोरे
1992 च्या विश्वचषक सामन्यात भारतानं पाकिस्तानला 217 धावांचं लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या दोन विकेट पडल्या होत्या. सचिन गोलंदाजी करत होता आणि जावेद मियांदाद फलंदाजी करत होता.  त्यावेळी किरण मोरे वारंवार अपील करत होते. ज्यामुळं याँदादने मोरे यांच्याबाबत पंचांकडं तक्रारही केली होती. मात्र, तरीही किरण मोरेचं अपील करणं सुरूच होतं. यावर मियांदाद इतका चिडला की त्यानं खेळपट्टीवर उड्या मारायला सुरुवात केली. ज्याचा व्हिडिओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल केला जातो. 

व्यंकटेश प्रसाद- आमिर सोहेल
व्यंकटेश प्रसाद- आमिर सोहेल यांच्यात 1996 च्या विश्वचषकात झालेला वाद आजही लोकांच्या लक्षात आहे. या सामन्यात भारतानं दिलेल्या 287 लक्ष्याचा पाठलाग करताना अमीर सोहेलनं चौकार मारून व्यंकटेश प्रसादला बोट दाखवलं. यानंतर पुढील चेंडूवर व्यंकटेश प्रसादनं अमीर सोहेलला बोल्ड केले. यानंतर व्यंकटेश प्रसादनं सोहेलला बोट दाखवत त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

हरभजन सिंह- शोएब अख्तर
भारताच फिरकीपटू हरभजन सिंह आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांच्यात 2010 मध्ये झालेल्या विश्वचषकात जबरदस्त वाद झाला होता. 47 व्या षटकात शोएब अख्तरच्या गोलंदाजीवर हरभजन सिंहनं षटकार मारला. त्यानंतर अख्तरनं हरभजनला अनेक बाऊन्सर टाकले. ज्यामुळं दोघांत मैदानातच वाद सुरू झाला.

गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी
2007 च्या कानपूर एकदिवसीय गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात झालेल्या भांडणाची घटना सर्वांना आठवत असेल. या घटनेत गंभीर आफ्रिदीच्या चेंडूवर धाव घेण्यासाठी धावला, तेव्हा आफ्रिदी धाव घेत असताना त्याच्यामध्ये आला आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली. 

गौतम गंभीर-कामरान अकमल
 गौतम गंभीर आणि कामरान अकमल यांच्यातील वाद क्रिकेटचा वाद अजूनही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. 2010 च्या आशिया कप सामन्यात सईद अजमलचा चेंडू गंभीरच्या बॅटमधून चुकला आणि कामरान अकमलच्या ग्लोव्हजमध्ये गेला. त्यावेळी अकमलनं चेंडू गंभीरच्या बॅटला लागल असून तो बाद असल्याची अपील केली. परंतु, पंचानी गंभीरला नाबाद घोषित केले. त्यानंतर ड्रिंक्स दरम्यान दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या दोघांचा वाद मिटवण्यासाठी पंचांना मध्यस्ती करावी लागली. 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL News : हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
AUS vs BAN 2nd Test : 229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
AUS vs BAN 2nd Test : स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
Mitchell Starc : 22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget