Commonwealth Games 2022 Day 1 Live Updates: क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिसपासून सर्वकाही; कॉमनवेल्थ स्पर्धेतील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Commonwealth Games 2022 Live: बर्मिंगहॅम येथे रंगणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Jul 2022 09:22 PM
Commonwealth Games 2022, India vs Pakistan : भारतीय बॅडमिंटनपटूंची पाकिस्तानवर मात

भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, किंदम्बी श्रीकांत यासाऱ्यांनी मिळून पाकिस्तानच्या खेळाडूंना मात देत 5-0 ने विजय मिळवला आहे.

CWG day 1 : आजच्य़ा दिवसातील उर्वरीत सामने

Commonwealth Games 2022, India vs Ghana : भारताचा घानावर दमदार विजय, 5-0 ने दिली मात

कॉमनवेल्थ खेळांच्या पहिल्या दिवशी भारताने दमदार खेळ सुरु ठेवला असून महिला हॉकी संघाने पहिल्याच सामन्यात घानावर 5-0 ने विजय मिळवला आहे.  

Commonwealth Games 2022, India vs Ghana : भारताचा घानावर दमदार विजय, 5-0 ने दिली मात

कॉमनवेल्थ खेळांच्या पहिल्या दिवशी भारताने दमदार खेळ सुरु ठेवला असून महिला हॉकी संघाने पहिल्याच सामन्यात घानावर 5-0 ने विजय मिळवला आहे.  

Commonwealth Games 2022, India vs Ghana : भारताचा पहिला गोल, 1-0 ची आघाडी

भारताच्या गुरजीत कौरने पहिला गोल करत घानाविरुद्धच्या सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली आहे.

CWG 2022 Live: भारतीय बॉक्सर शिव थापाचा पाकिस्तानवर विजय

बॉक्सिंगमध्ये भारताच्या शिव थापानं 63 किलो वजनी गटात 32व्या फेरीच्या सामन्यात पाकिस्तानच्या सुलेमान बलोचचा पराभव केला. शिव थापानं सुलेमानचा 5-0 असा पराभव केला.

Boxing Event : भारताचा शिव थापा विजयी, पाकिस्तानच्या बॉक्सरला दिली मात

कॉमनवेल्थ खेळांत 63 किलो वजनी गटात भारताचा बॉक्सर शिव थापाने पाकिस्तान्चया सुलेमान बलोचला 5-0 च्या फरकाने मात दिली आहे.  

CWG 2022 Live Updates: जलतरणपटू श्रीहरी नटराजची सेमीफाइनलमध्ये धडक

Commonwealth Games 2022: भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराजनं कॉमनवेल्थ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिलीय. त्यानं बॅकस्ट्रोक स्पर्धेत 54.68 सेंकदात 100 मीटर अंतर गाठलं

CWG 2022 Live: साजन प्रकाश उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी

जलतरण स्पर्धेत भारताची निराशाजनक सुरुवात झालीय. पुरुषांच्या 50 मीटर बटरफ्लाय स्पर्धेत हीट 6 मध्ये साजन प्रकाश आठव्या स्थानावर राहिला. त्यानं 25.01 सेकंद वेळ नोंदवली. साजनला उपांत्य फेरीपर्यंत मजल मारता आली नाही.

CWG 2022: लॉन बॉल्स स्पर्धेत भारताची तानिया चौधरीचा पराभव

लॉन बॉल्ससह भारतानं कॉमनवेल्थ स्पर्धेला सुरुवात केलीय. या पहिल्याच स्पर्धेत भारताचा पराभव झाला यहे. लॉन बॉल्स स्पर्धेत भारताच्या तानिया चौधरीचा स्कॉटलंडच्या डी हाँगनं 21-10 असा पराभव केला.

CWG 2022:  भारतानं टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

एजबॅस्टनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलाय. 

CWG 2022 Day 1 Live Updates: टेबल टेनिसमध्ये भारतीय जोडीनं दक्षिण आफ्रिकेला नमवलं

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिसमध्ये भारतीय जोडी रिथ टेनिसन आणि श्रीजा अकुलानं दमदार कामगिरी केली. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारतीय जोडीनं दक्षिण आफ्रिकेच्या लैला एडवर्ड्स आणि दानिशा जयवंतला पराभूत केलंय. 


 

CWG 2022 Day 1 Live Updates: लॉन बॉल खेळासह भारताची कॉमनवेल्थ स्पर्धेची सुरुवात

CWG 2022 Day 1 Live Updates: लॉन बॉल्समध्ये पुरुषांच्या विभागात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होईल. तर महिला विभागात भारत आणि स्कॉटलंड यांच्यात सामना होणार आहे. भारतीय महिला खेळाडू तानिया चौधरी डी होगनसोबत खेळणार आहे. 

CWG 2022 Day 1 Live Updates: कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक

कॉमनवेल्थ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अनेक भारतीय खेळाडू मैदानात उतरतील. भारतीय खेळाडूंचा सामना दुपारी एक वाजल्यापासून सुरू होईल. 



 

पार्श्वभूमी

Commonwealth Games 2022 Live: बर्मिंगहॅम येथे रंगणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा गुरुवारी पार पडला. ज्यात अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. मात्र, आजपासून कॉमनवेल्थ स्पर्धेतील स्पर्धांना सुरुवात होणार आहे. यामध्ये भारताचा पहिला सामना दुपारी एक वाजता सुरु होईल. लॉन बॉलमध्ये तानिया चौधरीचा सामना स्कॉटलंडच्या डी होगनशी होईल. पुरुषांच्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे.


भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार क्रिकेटचा पहिला सामना
यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत महिला क्रिकेटचाही राष्ट्रकुल स्पर्धेत समावेश करण्यात आलाय. यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. भारताकडून कुशाग्र रावत, साजन प्रकाश आणि श्रीहरी नटराज स्विमिंग स्पर्धेत नशीब आजमावतील. या स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनमधील पहिला सामना पाकिस्तानशी होईल. मिश्र दुहेरी गटातील या सामन्याला संध्याकाळी 6.30 वाजता सुरुवात होईल. 


भारतीय खेळाडू दिसणार सायकलिंग ट्रॅकवर
भारतीय खेळाडूही सायकलिंग ट्रॅकवर दिसणार आहेत. पुरुषांच्या स्पर्धेत विश्वजित सिंह, नमन कपिल, वेकाप्पा केंगलागुट्टी, दिनेश कुमार आणि अनाथ नारायण चार हजार मीटरमध्ये नशीब आजमावतील. दुपारी साडेचार वाजता टेबल टेनिस स्पर्धेला सुरूवात  होईल. यामध्ये पुरुष संघाचा सामना पहिल्या फेरीत बार्बाडोसशी होणार आहे. यानंतर भारतीय संघ सिंगापूरसोबत खेळणार आहे.


आज भारत आणि घाना यांच्यात हॉकी सामना
पहिल्या दिवशी भारतीय महिला हॉकी संघाचा सामना घानाशी होणार आहे. हा सामना संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. बॉक्सिंगमध्ये संध्याकाळी 5 वाजता शिव थापाची लढत पाकिस्तानच्या सुलेमान बलोचशी होईल. टेबल टेनिसमध्ये महिला संघ पहिल्या फेरीत दुपारी 2 वाजता दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. तर, योगेश्वर सिंह आणि सत्यजित मंडल जिम्नॅस्टिकमध्ये आपली ताकद दाखवतील. सायंकाळी 4.30 वाजल्यापासून सामन्याला सुरुवात होईल.


हे देखील वाचा- 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.