Dhananjay Munde & Chhagan Bhujbal : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच सरकारकडून विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, या समितीत वादग्रस्त राहिलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar Faction) माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना राष्ट्रवादीकडून कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने वेगवेगळ्या आमदारांना वेगवेगळ्या समितीत घेण्यात आले आहे. मात्र माजी मंत्री असलेले धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांना कुठेच कोणत्याही समिती स्थान दिले गेले नाही. अजित पवार यांनी जाणीवपूर्वक वादग्रस्त असलेले धनंजय मुंडे यांना समितीत स्थान न देता चार हात लांब ठेवल्याची जोरदार चर्चा आहे. 


मुंडेंचं खातं अजितदादांनी स्वतःकडेच ठेवल्याने भुजबळ नाराज?


दुसरीकडे, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेले मंत्रिपद देखील अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवल्याने छगन भुजबळांची नाराजी वाढत असल्याची माहिती मिळत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या मंत्रिपदावर भुजबळांची वर्णी लागेल, अशी जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचं खातं स्वतःकडेच ठेवले आहे. पक्षाचा ओबीसी चेहरा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भुजबळांना मंत्रिपदापासून लांब ठेवल्याने कार्यकर्त्यांनामध्ये नाराजी पसरल्याचे पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ यांनी नाराजी अजित पवार कशी दूर करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्या आणि प्रमुख


अंदाज समिती 
अर्जुन खोतकर 


लोकलेखा समिती
विजय वडेट्टीवार 


सार्वजनिक उपक्रम समिती 
राहुल कूल 


पंचायत राज समिती
 संतोष दानवे 


रोजगार हमी योजना समिती 
सुनील शेळके 


उपविधान समिती
प्रतापराव पाटील चिखलीकर 


अनुसूचित जाती कल्याण समिती
नारायण कुचे 


अनुसूचित जमाती कल्याण समिती 
दौलत दरोडा 


विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती 
 सुहास कांदे 


महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती 
मोनिका राजळे 


इतर मागासवर्ग कल्याण समिती 
किसन कथोरे 


अल्पसंख्यांक कल्याण समिती 
मुरजी पटेल 


मराठी भाषा समिती
 आशुतोष काळे 


विधानसभेच्या समित्या विशेषधिकार समिती 
नरेंद्र भोंडेकर 


विनंती अर्ज समिती 
अण्णा बनसोडे 


आश्वासन समिती 
रवी राणा 


नियम समिती 
राहुल नार्वेकर 


सदस्य अनुपस्थिती समिती 
किरण लहामटे


अशासकीय विधेयके व ठराव समिती 
चंद्रदीप नरके 


सदस्यांचे वेतन व भत्ते याबाबत संयुक्त समिती 
अजित पवार 


विधान मंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्तीवेतनाबाबत संयुक्त समिती 
अजित पवार 


ग्रंथालय समिती 
प्राध्यापक राम शिंदे 


आमदार निवास व्यवस्था समिती 
शिवेंद्रसिंहराजे भोसले 


आहार व्यवस्था समिती 
डॉक्टर बालाजी किनीकर 


धर्मादाय खाजगी रुग्णालयाची तपासणी करणे समिती 
डॉक्टर आशिष जयस्वाल 


वातावरणीय बदल संदर्भातील संयुक्त समिती 
राम शिंदे



आणखी वाचा 


'एकनाथला सांग, मला नाईलाजाने यांच्यासोबत राहावं लागतंय, मनात काही काळं ठेऊ नको'; संजय राऊतांनी फोन केल्याचा म्हस्केंचा दावा