क्रिकेटर रविंद्र जडेजाने शेअर केला पुष्पा द राइज सिनेमातील फेमस डायलॉगचा व्हिडीओ, चाहत्यांनी दिला 'हा' सल्ला
पुष्पा द राइज' (Pushpa: The Rise) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा सिनेमा चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडलाय. क्रिकेटर रविंद्र जडेजानेही या सिनेमाशी संबधीत एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Ravindra Jadeja 'Pushpa' Viral Video: दक्षिण भारतातील तेलगू स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांच्या 'पुष्पा द राइज' (Pushpa: The Rise) या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही या सिनेमाबाबत लोक चर्चा करतायेत. हा सिनेमा चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडलाय. सध्या सोशल मीडियावर चाहते या सिनेमाचे शाॉर्ट व्हिडीओ शेअर करत आहेत. भारतीय क्रिकेटर रविंद्र जडेजा यालाही हा सिनेमा चांगलाच आवडलेला दिसतोय. कारण जडेजाने या सिनेमाशी संबधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रविंद्र जडेजाने या सिनेमातील सर्वात फेमस डायलॉगचा एक व्हिडीओ तयार केला आहे. त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे जडेजाने शेअर केलेल्या या व्हिडीओची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. जडेजाने इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. जडेजाच्या चाहत्यांना हा व्हिडीओ आवडला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रविंद्र जडेजाने सिनेमात करावे, असा सल्ला चाहत्यांनी जडेजाला दिला आहे.
View this post on Instagram
'पुष्पा द राइज' हा सिनेमा 17 डिसेंबरला प्रदर्शीत झाला होता. हा सिनेमा सध्या रेकॉर्डब्रेक कमाई करत असून, लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा सिनेमा हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे. दुखापतीमुळे रविंद्र जडेजा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार नाही. सध्या तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. जडेजाला झालेली दुखापत बरी होण्यास आणखी बराच वेळ लागू शकतो. मात्र, तो आयपीएल 2022 पूर्वी बरा होईल, असेही सांगितले जात आहे.
17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 50 कोटींची कमाई केली. फक्त तमिळनाडूमध्येच या चित्रपटाने 4.06 कोटी कमावले. रिपोर्टनुसार, या चित्रपटाने ओपनिंग डेला तेलंगणामध्ये 11 कोटींची कमाई केली. चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. 'पुष्पा: द राइज' हा पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग आहे. 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे कथानक रेड सँडलवुड स्मगलर्सच्या जीवनावर आधारित आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Pushpa Box Office : साऊथ सुपरस्टार Allu Arjun चा बॉलिवूड बॉक्स ऑफिसवरही धमाका
- IPL Retention 2022 : जडेजा-पंतला धोनीपेक्षा जास्त पैसे, कोहलीच्या पगारातून दोन कोटींची कपात