एक्स्प्लोर
वाढदिवसाला त्रिशतक झळकावलं, हिमाचलच्या प्रशांत चोप्राचा पराक्रम
वाढदिवशी त्रिशतक झळकवणारा प्रशांत चोप्रा हा प्रथमश्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे.
मुंबई : हिमाचल प्रदेशच्या प्रशांत चोप्रानं रणजी करंडक स्पर्धेत त्रिशतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला आहे. धर्मशाला इथे सुरु असलेल्या पंजाब विरूद्धच्या सामन्यात प्रशांत चोप्रानं ही कामगिरी केली. विशेष बाब म्हणजे प्रशांतनं आपल्या पंचविसाव्या वाढदिवशीच त्रिशतकाला गवसणी घातली. वाढदिवशी त्रिशतक झळकवणारा प्रशांत चोप्रा हा प्रथमश्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे.
याआधी इंग्लंडच्या कॉलीन कॉडरे आणि भारताच्या रमण लांबा यांनी वाढदिवशीच त्रिशतक झळकावण्याचा मान मिळवला होता. कॉलीन कॉडरेनं 1962 साली आपल्या तिसाव्या जन्मदिनी त्रिशतक झळकावलं होतं. तर रमण लांबानं 1995ला 35व्या जन्मदिनादिवशी 312 धावा फटकावल्या होत्या.
प्रशांतनं आपल्या खेळीत 363 चेंडूंचा सामना करत 44 चौकार आणि दोन षटकारांसह 338 फटकावल्या. त्याच्या या खेळीनं हिमाचलनं आपल्या पहिल्या डावात 729 धावांचा डोंगर उभारला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement