एक्स्प्लोर
क्रिकेटपटू करुण नायरचं समुद्रकिनारी गर्लफ्रेण्डला प्रपोज
गुडघ्यावर बसून क्रिकेटपटू करुण नायरने गर्लफ्रेण्ड सनयाला लग्नाची मागणी घातली. तिनेही जराही वेळ न दवडता करुणला होकार दिला.
मुंबई : कसोटी क्रिकेटपाठोपाठ आयपीएलमध्ये चमक दाखवणारा क्रिकेटपटू करुण नायरने नुकतंच गर्लफ्रेण्डला प्रपोज केलं. सनया तनकारीवालासोबत करुण लवकरच लगीनगाठ बांधणार आहे. करुणने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन आपला आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
समुद्र किनारी सुट्टीवर गेल्याची संधी साधत करुणने सनयाला प्रपोज केलं. गुडघ्यावर बसून करुणने आपल्या गर्लफ्रेण्डला लग्नाची मागणी घातली. तिनेही जराही वेळ न दवडता करुणला होकार दिला. करुण आणि सनया गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. दोघांनी या क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
27 वर्षांच्या करुणने कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी बजावली आहे. 2013-14 मधील रणजी पदार्पणातच करुणच्या कर्नाटक संघाने करंडक जिंकला होता. 2014-15 च्या मोसमात कर्नाटकने पुन्हा रणजीवर नाव कोरलं, तेव्हा करुण दहा सामन्यांमध्ये 709 धावा ठोकल्या होत्या. रणजीच्या अंतिम फेरीत त्रिशतक झळकवणारा तो एकमेव फलंदाज ठरला आहे.
2016 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातून करुणने वनडेमध्ये पदार्पण केलं. तर त्याच वर्षी मोहालीमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद पदार्पणातील त्रिशतक (मेडन ट्रिपल सेंच्युरी) झळकवण्याचा मान करुणने पटकावला आहे. कसोटीमध्ये त्रिशतक ठोकणारा वीरेंद्र सेहवागनंतरचा तो दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. तर पदार्पणातील शतकाचं (मेडन सेंच्युरी) त्रिशतकात रुपांतर करणारा तो बॉब सिम्पसन आणि सर गारफील्ड सोबर्सनंतरचा जगातील तिसराच फलंदाज आहे.View this post on Instagram
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
भविष्य
क्रिकेट
बॉलीवूड
Advertisement