Ajinkya Rahane on Rohit Sharma : रोहित हा रोहित आहे, तो... हिटमॅनच्या खराब फॉर्मवर अजिंक्य रहाणे असं काही बोलला की सगळ्यांनीच ठोकला सलाम; म्हणाला...
Ranji Trophy Rohit Sharma : गेल्या काही महिन्यांत रोहित शर्माला त्याच्या खराब फलंदाजीमुळे बरीच टीका सहन करावी लागली आहे.
Ajinkya Rahane on Rohit Sharma : गेल्या काही महिन्यांत रोहित शर्माला त्याच्या खराब फलंदाजीमुळे बरीच टीका सहन करावी लागली आहे. अशा परिस्थितीत आता आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी रोहित 23 जानेवारीपासून 2024-25 च्या रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू आणि काश्मीर विरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या रणजी संघाकडून खेळताना दिसेल. आता मुंबई रणजी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेनेही रोहितबद्दल एक मोठे विधान केले आहे. ज्यामध्ये त्याने विश्वास व्यक्त केला आहे की, जेव्हा रोहित मैदानावर येईल. तेव्हा तुम्हाला त्याची धावांची भूक स्पष्टपणे दिसेल आणि तो मोठी धावसंख्या करेल.
जम्मू आणि काश्मीर विरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्याच्या एक दिवस आधी आयोजित पत्रकार परिषदेत अजिंक्य रहाणेने रोहितच्या फॉर्मबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाला की, बघा, रोहित हा रोहित आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. खरंतर, रोहित आणि यशस्वी दोघांनाही पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये पाहून मला खूप आनंद झाला आहे. रोहितला त्याचा खेळ चांगला माहीत आहे आणि म्हणूनच त्याला काय करायचे ते सांगण्याची गरज नाही. एकदा तो मैदानात उतरला की तो नक्कीच चांगली कामगिरी करेल असा मला पूर्ण विश्वास आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत त्यात कोणताही बदल झालेला नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे.
Rohit Sharma in Ranji jersey after a long time. pic.twitter.com/Jq5FL09zQ8
— R A T N I S H (@LoyalSachinFan) January 21, 2025
प्रत्येक खेळाडू चढ-उतारांच्या या टप्प्यातून जात असतो...
मुंबई रणजी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे रोहित शर्माबद्दल पुढे म्हणाला की, प्रत्येक खेळाडूला त्याच्या कारकिर्दीत असे चढ-उतार येतात. रोहितबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याच्यात अजूनही धावांची भूक आहे. त्याने सराव करताना खरोखरच चांगली फलंदाजी केली आणि मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे.
Rohit Sharma in today's nets session.
— Vishal. (@SPORTYVISHAL) January 22, 2025
Hitman is coming tomorrow 🐐. pic.twitter.com/G98Nq0iHQk
रोहित फक्त जम्मू आणि काश्मीर विरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात खेळताना दिसू शकतो, कारण त्यानंतर त्याला इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आणि नंतर 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल.
Captain Rohit Sharma and Ajinkya Rahane during today's practice session.🙌🔥
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) January 21, 2025
Two brothers coming back 🤍🤍 pic.twitter.com/JjqQeJUvZn
हे ही वाचा -