Yuvraj Singh Six Sixes: 6 चेंडूत 6 षटकार! आजच्याच दिवशी 15 वर्षांपूर्वी युवराज सिंहनं रचला इतिहास, पाहा व्हिडिओ
Yuvraj Singh celebrates 15th anniversary of ‘six sixes’ in one over: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि तडाखेबाज फलंदाज युवराज सिंहनं 10 जून 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय.
Yuvraj Singh celebrates 15th anniversary of ‘six sixes’ in one over: भारताचा माजी क्रिकेटपटू आणि तडाखेबाज फलंदाज युवराज सिंहनं 10 जून 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. युवराजनं त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. क्रिकेटच्या मैदानात त्यानं रचलेले अनेक विक्रम आजही आबाधित आहेत. दरम्यान, आजच्या दिवशी 15 वर्षांपूर्वी युवराज सिंहनं 2007 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध सहा चेंडूत सहा षटकार मारून इतिहास रचलाय. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणार युवराज सिंह पहिला खेळाडू आहे.
दरम्यान, 2007 च्या टी-20 विश्वचषकातील गट सामन्यात भारत आणि इंग्लंड आमने सामने आले होते. या सामन्यात युवराज सिंहनं 16 चेंडत 58 धावा केल्या. ज्यात 7 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, त्यानं स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार ठोकले. या सामन्यातील 19व्या षटकात युवराजनं सहा षटकार मारून इतिहास रचला. युवराजच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं इंग्लंडसमोर 218 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.
व्हिडिओ-
भारताचा 18 धावांनी विजय
भारतानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाला 20 षटकात 6 विकेट्स गमावून 200 धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडकूडून विक्रम सोलंकीनं सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. तर, कर्णधार पॉल कॉलिंगवूडनं 20 चेंडूत 28 धावा केल्या. भारताकडून इरफान पठाणनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, आरपी सिंहला दोन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, हरभजन सिंहनं विकेट्स मिळवली. हा सामना भारतानं 18 धावांनी जिंकला.
युवराज सिंहची कारकिर्द
युवराज सिंहनं भारतासाठी 40 कसोटी, 304 एकदिवसीय आणि 58 टी-20 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलंय. कसोटीत युवराज सिंहनं 1 हजार 900 धावा केल्या आहेत. ज्यात त्यानं तीन शतकं आणि 11 अर्धशतक झळकावली आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 शतक आणि 52 अर्धशतकांच्या जोरावर त्यानं 8 हजार 701 धावा (सर्वोत्तम धावसंख्या- 169) केल्या आहेत. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 1 हजार 177 धावांची (सर्वोत्तम धावसंख्या- 150) नोंद आहे. ज्यात 8 अर्धशतकांचा समावेश आहे. युवराज सिंहनं आयपीएलमध्ये 132 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 2 हजार 750 धावा (सर्वोत्तम धावसंख्या-83) केल्या आहेत.
हे देखील वाचा-