Yashasvi Jaiswal Celebration : यशस्वी जैस्वालचं शतक, अनोख्या सेलिब्रेशननं गाजवले मैदानावर, कोणाला दिला 'फ्लाईंग किस'? VIDEO तुफान व्हायरल
England vs India 5th Test Update : भारतीय संघाचा तडाखेबाज सलामीवीर यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीत दुसऱ्या डावात जबरदस्त शतक ठोकलं.

Yashasvi Jaiswal century Ind vs Eng 5th Test : भारतीय संघाचा तडाखेबाज सलामीवीर यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीत दुसऱ्या डावात जबरदस्त शतक ठोकलं. विशेष म्हणजे हे शतक त्याच्या कुटुंबासमोर झळकवलं आणि शतकानंतर केलेल्या सेलिब्रेशनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने केवळ 127 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह हे शतक साकारलं. इंग्लंडविरुद्धचं हे त्याचं चौथं शतक ठरलं, तर टेस्ट कारकिर्दीतील हे सहावं शतक आहे. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडिया अखेरच्या कसोटीत मजबूत स्थितीत पोहोचली.
Yashasvi Jaiswal keeps India ticking with a century of grit and flair 💯#WTC27 | 📝 #ENGvIND: https://t.co/SNl4Ym0dTV pic.twitter.com/k84P0o7ud6
— ICC (@ICC) August 2, 2025
अनोख्या सेलिब्रेशननं गाजवले मैदानावर, कोणाला दिला 'फ्लाईंग किस'?
शतक साजरं करताना यशस्वीने खास अंदाज दाखवला. शतक पूर्ण झाल्यावर त्याने जोरात उडी घेतली, मग बॅट आणि हेल्मेट खाली ठेवत हातातील ग्लोव्हज काढले आणि फ्लाईंग किस देत सेलिब्रेशन केलं. त्यानंतर दोन्ही हातांनी हार्ट तयार करत पुन्हा एकदा फ्लाईंग किस दिला. हे सगळं पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. काहींच्या मते, यावेळी त्याचे कुटुंब स्टेडियममध्ये उपस्थित होते, त्यामुळे हा फ्लाईंग किस त्यांच्यासाठीच होता असं मानलं जातं.
लीड्सनंतर ओव्हलवरही शतक, कसोटीत सततची कामगिरी
ओव्हलपूर्वी यशस्वीने लीड्स कसोटीतही 101 धावांची खेळी केली होती. त्याशिवाय एजबॅस्टनमध्ये 87 आणि मॅंचेस्टरमध्ये 58 धावांची अर्धशतकी खेळी त्याने केली. या मालिकेत दोन वेळा तो शून्यावरही बाद झाला होता, पण त्याच्या दमदार पुनरागमनाने सर्वांचं लक्ष वेधलं.
A Test Match hundred in front of your family ✅
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) August 2, 2025
Well done, Yashasvi Jaiswal 💗🇮🇳 pic.twitter.com/IlbANctdLV
यशस्वीचा ऐतिहासिक विक्रम, सचिन-विराटला मागं टाकलं
इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत यशस्वीने टेस्ट क्रिकेटमधील आपले 2000 धावा पूर्ण केल्या, यासोबतच तो भारताकडून सर्वात कमी म्हणजे फक्त 40 डावांत 2000 धावा पूर्ण करणारा सह-विक्रमवीर ठरला. या यादीत त्याच्यासोबत फक्त राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांची नावं आहेत. त्याच्या या दमदार कामगिरीने त्याने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीलाही मागं टाकलं आहे.
In a class of his own ⭐#SonySportsNetwork #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia #ExtraaaInnings | @ybj_19 pic.twitter.com/dLCc4Iq4iN
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 2, 2025
हे ही वाचा -





















